esakal | 'क्या बात ये' धनश्रीच्या नादानं युजी परफेक्ट स्टेप्स शिकला की... | Viral Video
sakal

बोलून बातमी शोधा

Video : 'क्या बात ये' धनश्रीच्या नादानं युजी  परफेक्ट स्टेप्स शिकला की...

Video : 'क्या बात ये' धनश्रीच्या नादानं युजी परफेक्ट स्टेप्स शिकला की...

sakal_logo
By
सुशांत जाधव

टी-20 वर्ल्ड कप संघातून वगळल्यानंतर युजवेंद्र चहल आयपीएल स्पर्धेत दमदार कामगिरी करताना दिसतोय. आपल्या फिरकीवर प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंना नाचवणारा युजी सोशल मीडियावर आपल्या अतरंगी स्वभावानेही चांगलाच प्रसिद्ध आहे. प्रोफेशनल डॉक्टर आणि कोरिओग्राफर असलेली पत्नी त्याला वेगवेगळ्या गाण्यावर नाचवत असते. धनश्री वर्माच्या डान्स स्टेप्स बघण्याजोग्या असतातच शिवाय दिवसेंदिवस युजीच्या स्टेप्सही सुधारत असल्याचे दिसते.

आयपीएल स्पर्धेत व्यस्त असलेला युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांचा आणखी एक व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. मैदानातील दमदार कामगिरीसह चहल डान्सनेही नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसते. युजी आणि धनश्री जोडीचा पंजाबी गाण्यावरील डान्स सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्माने एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय. पंजाबी गायक हार्डी संधुच्या 'क्या बात ऐ' या प्रसिद्ध गाण्यावर ही जोडी थिरकताना दिसते. सोशल मीडिया हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत असून यावरने भन्नाट प्रतिक्रियाही उमटताना दिसते. धनश्री वर्माचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फॉलोवर्स आहेत. पण या व्हिडिओत युजीच्या डान्स स्टेप सुधारल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे नेटकरी चहलचे विषेश कौतुक करताना पाहायला मिळते.

चहल आणि धनश्री वर्मा मागील वर्षी 22 डिसेंबरला विवाह बंधनात अडकले होते. डान्स स्टेप ही त्यांच्या प्रेमाची पहिली पायरी होती. डान्स शिकण्याच्या निमित्ताने धनश्रीच्या संपर्कात आल्यानंतर या दोघांची प्रेम कहाणी सुरु झाली होती. सध्याच्या घडीला चहल युएईमध्ये रंगलेल्या आयपीएल स्पर्धेत बंगळुरु संघाचे प्रतिनिधीत्व करत आहे. पत्नी धनश्रीही त्याच्यासोबतच आहे.

loading image
go to top