esakal | IPL 2021, RCB vs KKR बॅटिंग घेऊन फसलो की काय? कोहलीचा डग आउटमधील फोटो व्हायरल
sakal

बोलून बातमी शोधा

RCB vs KKR

बॅटिंग घेऊन फसलो की काय? कोहलीचा डग आउटमधील फोटो व्हायरल

sakal_logo
By
सुशांत जाधव

IPL 2021,RCB vs KKR Eliminator Match : आयपीएलच्या 14 व्या हंगामात दिमाखात प्ले ऑफ गाठलेल्या RCB समोर कोलकाताला रोखण्याचे आव्हान आहे. विराट कोहलीने टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आपला निर्णय सार्थ ठरवण्यासाठी विराट कोहली एकटा पडल्याचे पाहायला मिळाले. युवा सलामीवीर देवदत्त पडिक्कल, श्रीकर भरत यांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. मॅक्सवेल, एबी डिव्हिलियर्स आणि शहाबाज यांनी दुहेरी आकडा गाठला. त्यांनी 15, 11 आणि 13 अशी धावसंख्या केली. पण त्यांना नावाला साजेसा खेळ दाखवता आला नाही.

विराट कोहलीच्या 39 धावा वगळता अन्य कोणत्याही फलंदाजाला मैदानात तग धरुन थांबून फटकेबाजी करता आली नाही. संघाची ही अवस्था पाहून डग आउटमध्ये विराट कोहली निराश अवस्थेत बसल्याचे कॅच झाले आहे. सोशल मीडियावर हा फोटो व्हायरल होत आहे. टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग घेऊन फसलो की काय? अशी भावमूद्रा त्याच्या चेहऱ्यावर दिसून येते.

हेही वाचा: Video : नारायण...नारायण! विराट-एबीचा सेम टू सेम बोल्ड

कोहलीच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आतापर्यंतही एकही आयपीएल ट्रॉफी जिंकलेली नाही. यंदाच्या हंगामानंतर तो संघाचे कर्णधारपदही सोडणार आहे. त्यामुळे त्याच्यासाठी ही स्पर्धा खास आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने शारजाच्या मैदानात प्रतिस्पर्धी कोलकाता संघासमोर 139 धावांचे आव्हान ठेवले आहे.

हेही वाचा: Video: चिमुरडी ढसाढसा रडली; मग माहीनेच फुलवलं चेहऱ्यावर हसू!

फलंदाजीतील उणीवा भरुन काढण्यासाठी आता बंगळुरुच्या गोलंदाजांसमोर मोठी कसोटी आहे. जर बंगळुरुचा संघ कोलकाताला रोखू शकला नाही तर त्यांच्या स्पर्धेतील प्रवास इथेच संपुष्टात येईल. आणि विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील ट्रॉफीचा दुष्काळ शेवटपर्यंत कायम राहिल.

loading image
go to top