esakal | Video: धोनीसाठी चिमुरडी ढसाढसा रडली; मग माहीनेच फुलवलं चेहऱ्यावर हसू! | MS Dhoni
sakal

बोलून बातमी शोधा

MS-Dhoni-Girl-Crying

MSD ने शेवटच्या षटकात फिरवला सामना

Video: चिमुरडी ढसाढसा रडली; मग माहीनेच फुलवलं चेहऱ्यावर हसू!

sakal_logo
By
विराज भागवत

IPL 2021 Qualifier 1: भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला. त्यानंतरच्या IPLमध्ये धोनीच्या CSKने खराब कामगिरी केली. पण सध्या सुरू असलेल्या IPL मध्ये धोनी आणि चेन्नईच्या संघाने धडाकेबाज पुनरागमन केले. प्ले ऑफच्या पहिल्या सामन्यात कर्णधार धोनीने शेवटच्या षटकात तब्बल ३ चौकार आणि १ षटकार खेचत संघाला चित्तथरारक विजय मिळवून दिला. सामना प्रत्येक चेंडूगणिक एका संघाकडून दुसऱ्या संघाकडे झुकत होता. त्यामुळे चेन्नईची फॅन असलेली एक चिमुरडी अक्षरश: ढसाढसा रडायला लागली. पण धोनीने सामना जिंकवून एक अशी कृती केली की त्यामुळे त्या चिमुरडीच्या चेहऱ्यावर हास्य उमलले.

हेही वाचा: तो मॅच विनर आहे हे विसरु नका; गावसकरांचा CSK ला सल्ला

CSK vs DC सामन्यात शेवटच्या पाच षटकात सामना अटीतटीचा होता. एक-दोन चेंडू निर्धाव पडायचे तर पुढच्या चेंडूवर चौकार किंवा षटकार मारल्याने पुन्हा सामन्यात रंगत यायची. १९वे षटक रबाडाला न देता आवेश खानला देण्यात आली. सामना जेव्हा दिल्लीच्या दिशेने फिरला त्यावेळी CSK ची फॅन असलेली चिमुरडी ढसाढसा रडायला लागली. पण जेव्हा धोनी मैदानात आला तेव्हा धोनीने धडाकेबाज फटकेबाजी केली आणि संघाला विजय मिळवून दिला. इतकेच नव्हे तर धोनीने आपल्या स्वाक्षरीचा एक चेंडू त्या चिमुरडीला गिफ्ट करत तिच्या चेहऱ्यावर हसू फुलवलं.

हेही वाचा: Video : पंतचा एकहाती फटका, धोनी-ठाकूर बघतच राहिले

पात्रता फेरीच्या पहिल्या सामन्यात दिल्लीने पृथ्वी शॉ आणि ऋषभ पंत या दोघांच्या अर्धशतकाच्या जोरावर प्रथम फलंदाजी करत २० षटकात १७२ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना ऋतुराज गायकवाड आणि रॉबिन उथप्पा या दोघांनी अर्धशतके ठोकली. तर शेवटच्या टप्प्यात धोनीने ६ चेंडूत नाबाद १८ धावा करत संघाला विजय मिळवून दिला.

loading image
go to top