esakal | RCB vs KKR : छोट्याखानी खेळीतही कोहलीच्या नावे 'विराट' विक्रम
sakal

बोलून बातमी शोधा

Virat Kohli

छोट्याखानी खेळीतही कोहलीच्या नावे 'विराट' विक्रम

sakal_logo
By
सुशांत जाधव

IPL 2021, RCB vs KKR : आयपीएलच्या 14 व्या हंगामातील एलिमिनेटरच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाचा कर्णधार विराट कोहलीने संघाकडून सर्वोच्च धावसंख्या केली. कोलकाता विरुद्धच्या सामन्यात कोहलीने 33 चेंडूत 5 चौकाराच्या मदतीने 39 धावा केल्या. या छोट्याखानी खेळीनंतरही कोहलीने एका खास विक्रमाला गवसणी घातली.

विराट कोहलीने (Virat Kohli 900 four टी20 क्रिकेटमध्ये 900 चौकार मारण्याचा टप्पा पार केला. टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक चौकार खेचणाऱ्या भारतीय फलंदाजांमध्ये तो दुसऱ्या स्थानावर आहे. या यादीत शिखर धवन अव्वलस्थानी आहे. या यादीत वेस्टइंडीजचा सलामीवीर क्रिस गेल (Chris Gayle) अव्वलस्थानी आहे. त्याने टी-20 मध्ये 1105 चौकार खेचले आहेत. शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) खात्यात 986 चौकार असून तो दुसऱ्या स्थानावर आहे. यांच्या पाठोपाठ ऑस्ट्रेलियचा डेव्हिड वॉर्नर 973 चौकारांसह तिसऱ्या स्थानावर आहे.

हेही वाचा: बॅटिंग घेऊन फसलो की काय? कोहलीचा डग आउटमधील फोटो व्हायरल

आयपीएलमध्ये धवनच्या खात्यात सर्वाधिक चौकारांची नोंद

आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा सलामीचा फलंदाज शिखर धवनच्या नावे सर्वाधिक चौकारांची नोंद आहे. त्याने 191 सामन्यात 653 चौकार मारले आहेत. त्याच्यापाठोपाठ विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर ओआहे. कोहलीने 207 सामन्यात 546 चौकार खेचले आहेत.

हेही वाचा: Video : नारायण...नारायण! विराट-एबीचा सेम टू सेम बोल्ड

400 पेक्षा अधिक धावांचा चौकार

विराट कोहलीने कोलकाता नाईट रायडर्सच्या विरुद्धच्या सामन्यात हंगामातील 400 धावांचा टप्पा पार केला. सलग चौथ्या हंगामात कोहलीने आयपीएलच्या एका हंगामात 400 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत.

loading image
go to top