Video : विल्यमसनमध्ये संचारला सुपरमॅन, अप्रतिम थ्रो करुन फिरवली मॅच

15 व्या षटकातील पहिल्या चेंडूवर सामना पुन्हा सनरायझर्स हैदराबादच्या बाजूनं झुकला.
Video : विल्यमसनमध्ये संचारला सुपरमॅन, अप्रतिम थ्रो करुन फिरवली मॅच

IPL 2021, RCB vs SRH : अबुधाबीच्या शेख झायद स्टेडियमवर (Sheikh Zayed Stadium, Abu Dhabi) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore) आणि सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) यांच्यातील सामना शेवटच्या शटकापर्यंत रंगतदार झाला. अनुभवी भुवनेश्वर कुमारने (Bhuvneshwar Kumar) अखेरच्या षटकात एबीला (AB de Villiers) मोठे फटके मारण्यापासून रोखत संघाला विजय मिळवून दिला. हैदराबादने दिलेल्या 142 धावांचा पाठलाग करताना भुवीनं पहिल्याच षटकात विराटची विकेट घेत बंगळुरुला बॅकफूटवर ढकलले होते. डेनियल क्रिस्टन (1), श्रीकर भरत (12) धावा करुन परतल्यानंतर युवा सलामीवीर देवदत्त पडिक्कलने खिंड लढवली. मॅक्सवेलने (Glenn Maxwell) आपल्या शैलीत धमाकेदार फलंदाजी करत सामना बंगळुरच्या बाजूनं झुकवलाही.

पडिक्कल आणि मॅक्सवेल यांनी चौथ्या विकेटसाठी 52 धावांची भागीदारी करुन रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला सामन्यात आणले. पण केन विल्यमसनने (Kane Williamson) हार मानली नाही. 15 व्या षटकातील पहिल्या चेंडूवर सामना पुन्हा सनरायझर्स हैदराबादच्या बाजूनं झुकला. या षटकातील राशिद खानच्या पहिल्या चेंडूवर देवदत्त पडिक्कलने चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला. केन विल्समसनने सुपर मॅनसारखा थ्रो करत मॅक्सवेलला धावबाद केले. तो 25 चेंडूत 40 धावा करुन परतला. इथेच सामन्याला कलाटणी मिळाली. 17 व्या षटकात राशिद खानने पडिक्कलला बाद करत सामन्यात आणखी रंगत आणली. अखेर बंगळुरुला चॅलेंज परतवण्यात अपयश आले.

अखेरच्या षटकात एबीवर होती आस...

अखेरच्या षटकात एबी डिव्हिलियर्सवर साऱ्या क्रिकेटर्सच्या नजरा खिळल्या होत्या. दुसऱ्या बाजूला केन विल्यमसनने अनुभवी भुवीच्या हाती चेंडू सोपवला. 6 चेंडूत 13 धावा एबीसाठी सहज शक्य होत्या. पण भुवीनं त्याला फटकेबाजी करण्याची संधीच दिली नाही. गार्टनने पहिला चेंडू निर्धाव खेळल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर एक धाव घेत एबीला स्ट्राइक दिला. 4 चेंडूत 12 धावांची आवश्यकता असताना एक धाव मिळत असताना एबीने त्यास नकार दिला. चौथ्या चेंडूवर षटकार खेचत एक धाव का घेतली नाही, याची झलक एबी डिव्हिलियर्सनं दाखवून दिली. पाचवा चेंडू फुलटॉस असतानाही एबीनं निर्धाव खेळला. अखरच्या चेंडूवर त्याला एकच धाव करता आली आणि सामना हैदराबादने जिंकला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com