IPL 2021: KKR नं 'येरे माझ्या मागल्या.. गाणं वाजवलं...

अखेरचा सामना त्यांनी दिल्ली कॅपिटल्ससोबत खेळला यातही त्यांना पराभव स्विकारावा लागला.
Kolkata Knight Riders
Kolkata Knight Riders

IPL 2021 Second Phase In UAE : इयॉन मॉर्गनच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाईट रायडर्संनेही पहिल्या टप्प्यात विजयी सलामी दिली. स्पर्धेची सुरुवात दमदार कुरुन पुन्हा त्यांनी 'येरे माझ्या मागल्या.. गाणं वाजवलं. केली होती. सनरायझर्सं हैदराबाद विरुद्ध त्यांनी 10 धावांनी विजय नोंदवला. त्यानंतर मात्र त्यांना सलग चार सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. मुंबई इंडियन्स, आरसीबी, चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थानने त्यांना पराभवाचा दणका दिला.

कोरोनाच्या प्रादुर्भावाने स्पर्धा स्थगित होण्यापूर्वी पंजाब विरुद्धच्या सामन्यात त्यांनी पाच विकेट्सनी विजय नोंदवत स्पर्धेतील दुसऱ्या विजयाची नोंद केली होती. अखेरचा सामना त्यांनी दिल्ली कॅपिटल्ससोबत खेळला यातही त्यांना पराभव स्विकारावा लागला. 7 पैकी त्यांनी 2 सामने जिंकले असून 5 सामन्यांत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.

पहिल्या टप्प्यातील कोलकाताचे सामने आणि निकाल

कोलकाता वि. हैदराबाद - कोलकाता १० धावांनी विजय

कोलकाता वि. मुंबई - मुंबई १० धावांनी विजय

कोलकाता वि. बंगळुरु- बंगळुरु १० धावांनी विजय

कोलकाता वि. चेन्नई - चेन्नई १८ धावांनी विजय

कोलकाता वि. राजस्थान - राजस्थान ६ गडी राखून विजय

कोलकाता वि. पंजाब - कोलकाता ५ गडी राखून विजय

कोलकाता वि. दिल्ली ५ गडी राखून विजय

पहिल्या टप्प्यानंतरचा गुणतक्ता

१. दिल्ली - ८ सामन्यांत १२ गुण

२. चेन्नई - ७ सामन्यांत १० गुण

३. बंगळुरू - ७ सामन्यात १० गुण

४. मुंबई - ७ सामन्यात ८ गुण

------------------------------------------

५. राजस्थान - ७ सामन्यात ६ गुण

६. पंजाब - ८ सामन्यात ६ गुण

७. कोलकाता - ७ सामन्यात ४ गुण

८. हैदराबाद - ७ सामन्यात २ गुण

दुसऱ्या टप्प्यातील सामन्यांसाठी कोलकाताचा संघ

इयॉन मॉर्गन (कर्णधार), दिनेश कार्तिक, करुण नायर, नितीश राणा, राहुल त्रिपाठी, रिंकू सिंग, शेल्डन जॅक्सन, शुभमन गिल, टिम सेफर्ट, आंद्रे रसेल, बेन कटिंग, पवन नेगी, शाकिब अल हसन, सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर. हरभजन सिंग, कमलेश नागरकोटी, कुलदीप यावद लॉकी फर्गुसन, प्रसिद्ध कृष्णा, संदीप वॉरियर, शिवम मावी, वैभव अरोरा, टिम साउदी, वरुण चक्रवर्थी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com