तो मॅच विनर आहे हे विसरु नका; गावसकरांचा CSK ला सल्ला

यंदाच्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जचा संघ चांगली कामगिरी करत असला तरी,...
तो मॅच विनर आहे हे विसरु नका; गावसकरांचा CSK ला सल्ला

IPL 2021, CSK vs DC Qualifier 1 : ज्या चेन्नई सुपर किंग्जचा गत हंगामातील प्रवास प्ले ऑफच्या आधीच संपुष्टात आला होता त्या संघाने यंदाच्या हंगामात दमदार कमबॅक केले. त्यांनी पहिल्यांदा प्ले ऑफचं तिकीट पक्क करुन दुसऱ्या क्रमांकावर स्थान मिळवलं. पहिल्या क्वालिफायरमध्ये चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) आणि यंदाच्या हंगामात नंबर वन असलेल्या दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यात सामना रंगणार आहे. या सामन्यात जो जिंकेल तो थेट फायनलमध्ये प्रवेश करेल. दुसरीकडे पराभूत होणाऱ्या संघाला आणखी एक संधी असेल.

प्ले ऑफमधील महत्त्वपूर्ण सामन्यापूर्वी भारताचे माजी क्रिकेटर सुनील गावसकर यांनी महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जला मोलाचा सल्ला दिला आहे. मध्यफळीत त्यांनी रॉबिन उथप्पाच्या जागी पुन्हा एकदा सुरेश रैनाला खेळवण्याला पंसती दिली आहे. यंदाच्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जचा संघ चांगली कामगिरी करत आहे. फाफ ड्युप्लेसिस, ऋतुराज गायकवाड, रविंद्र जाडेजा आणि अन्य खेळाडूंनी संघासाठी बहुमूल्य योगतान दिल्याचे पाहायला मिळाले.

तो मॅच विनर आहे हे विसरु नका; गावसकरांचा CSK ला सल्ला
T20 World Cup विजेता संघ होणार मालामाल; कोणाला किती रक्कम?

तिसऱ्या आणि चौथा क्रमांक चेन्नईसाठी पडकी बाजू झाल्याचे दिसते. यात सुधारणा करण्यासाठी आयपीएल स्पेशलिस्ट सुरेश रैनाला बाकावर बसवून चेन्नई सुपर किंग्जने रॉबिन उथप्पाला मागील दोन सामन्यात संधी दिली. त्यांच्या या निर्णयाचे गौतम गंभीर याने समर्थनही केले. आणि पुढच्या सामन्यातही त्याला कायम खेळवण्याचा सल्ला चेन्नईला देऊन टाकला. पण गावसकरांनी अगदी गंभीरच्या विरुद्ध प्रतिक्रिया दिली आहे.

तो मॅच विनर आहे हे विसरु नका; गावसकरांचा CSK ला सल्ला
Video : अजब-गजब विकेट; चौकार मारला पण दांड्या उडल्या!

महत्त्वाच्या सामन्यात सुरेश रैनाला पुन्हा प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान द्यावे, असे मत गावसकरांनी मांडले आहे. एका लेखामध्ये त्यांनी लिहिलंय की, अनुभवाच्या जोरावर महत्त्वपूर्ण लढतीत रैनाला पुन्हा संघा घ्यायला पाहिजे. तो एक मॅच विनर खेळाडू आहे. सध्याच्या घडीला तो धावा करण्यासाठी संघर्ष करत असला तरी त्याची क्षमत आणि मोठ्या सामन्यातील अनुभवाचा संघाला अधिक फायदा होईल. नोर्तेजे, रबाडा आणि आवेश खानचा सामना करणे रैनासाठी आव्हानात्मक निश्चित असेल, पण फायनलमध्ये खेळण्यासाठी तुम्हाला त्याला खेळवण्याची जोखीम घ्यावीच लागेल, असा सल्ला गावसकरांनी चेन्नईच्या संघाला दिलाय.

मागील हंगामात आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच चेन्नई सुपर किंग्जचा संघ प्ले ऑफमध्ये पोहचण्यात अपयशी ठरला. या स्पर्धेत सुरेश रैना खेळला नव्हता. यंदाच्या हंगामात तो संघासोबत जॉईन झाला पण 12 सामन्यात त्याला केवळ 160 धावा करता आल्या. मागील काही सामन्यांचा विचार केला तर 4, 17*, 11, 2 आणि 3 अशी धावसंख्या त्याने केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com