IPL 2021: राजस्थान जिंकलं तरीही गावसकर कर्णधारावर नाराज

Sunil-Gavaskar-Sanju-Samson
Sunil-Gavaskar-Sanju-Samson
Summary

राजस्थानच्या संघाने शेवटच्या चेंडूवर मिळवला थराराक विजय

IPL 2021: राजस्थानच्या संघाने पंजाबविरूद्धच्या सामन्यात दमदार विजय मिळवला. अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत रंगतदार झालेल्या सामन्यात २० वर्षीय कार्तिक त्यागीने राजस्थानला विजय मिळवून दिला. शेवटच्या काही षटकांमध्ये राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन याने आपल्या गोलंदाजांना योग्य मार्गदर्शन करत विजय मिळवून दिला. पण असे असले तरी भारताचा लिटल मास्टर सुनील गावसकर यांनी संजू सॅमसनबद्दल नाराजी व्यक्त केली.

Sunil-Gavaskar-Sanju-Samson
IPL 2021: "आम्ही फलंदाजांना स्पष्ट सूचना दिल्या होत्या की.."

"संजू सॅमसन चांगला खेळाडू आहे. पण तो बेजबाबदार फटका मारून बाद झाला. आंतरराष्ट्रीय स्तरावर असो किंवा इतर स्पर्धांमध्ये असो, तो सलामीला फलंदाजी करत नाही. तो नेहमी चौथ्या किंवा पाचव्या क्रमांकावरच फलंदाजी करतो. अशा वेळी फलंदाजी करताना पहिल्या चेंडूपासूनच हवाई फटके मारणे योग्य नाही. फलंदाज कितीही चांगल्या फॉर्ममध्ये असला तरीही पहिल्या चेंडूपासून फटकेबाजी करणं शक्य नाही. आधी पिचवर सेट होणं महत्त्वाचं आणि मग हवेत फटकेबाजी करायला हवी", अशा शब्दात गावसकर यांनी सॅमसनच्या फलंदाजीबद्दल नाराजी व्यक्त केली.

Sanju-Samson- Ishan-Porel
Sanju-Samson- Ishan-Porel
Sunil-Gavaskar-Sanju-Samson
VIDEO : कॅरेबियन गड्याचा भन्नाट कॅच; रॉयल इंग्लिश मॅनचा खेळ खल्लास!

दरम्यान, राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना सर्वबाद १८५ धावा केल्या. सलामीवीर एव्हिन लुईस (३६) आणि यशस्वी जैस्वाल (४९) यांनी संघाला चांगली सुरूवात करून दिली. महिपाल लॉमरॉरने तुफान फटकेबाजी करत १७ चेंडूत ४३ धावा कुटल्या. १८६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबचे सलामीवीर राहुल (४९) आणि मयंक अग्रवाल (६७) यांनी १२० धावांची भागीदारी केली. हे दोघे बाद झाल्यावर निकोलस पूरनने (३२) फटकेबाजी केली. एडन मार्क्रमही दमदार फलंदाजी करत होता, पण शेवटच्या दोन षटकात त्याला फारशी फलंदाजी मिळाली नाही. परिणामी शेवटच्या षटकात ४ धावांची गरज असूनही पंजाबला त्या धावा जमवता आल्या नाहीत. कार्तिक त्यागीने शेवटच्या षटकात केवळ १ धाव देत राजस्थानला थरारक विजय मिळवून दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com