esakal | IPL 2021: ऐतिहासिक दिवस! एकाच वेळी चार संघ उतरणार मैदानात | MI vs SRH | DC vs RCB
sakal

बोलून बातमी शोधा

MI vs RR

IPL 2021: ऐतिहासिक दिवस! एकाच वेळी चार संघ उतरणार मैदानात

sakal_logo
By
सुशांत जाधव

Indian Premier League 2021: इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या इतिहासात पहिल्यांदाच चार टीम एकाच वेळी मैदानात उतरल्याचे पाहायला मिळणार आहे. ‘सुपर फ्रायडे’च्या डबल हेडर लढतीत एकाच वेळी 55 आणि 56 वा सामना रंगणार आहे. आयपीएलमध्ये डबल हेडर सामने नवे नाहीत. पण पहिल्यांदाच एकाच वेळी दोन्ही सामने खेळवण्यात येतील.

भारतीय प्रमाणवेळेनुसार 7.30 वाजता अबू धाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर (Sheikh Zayed Stadium, Abu Dhabi) सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यात सामना रंगेल. दुसऱ्याबाजूला याच वेळी रॉयल चॅलेजर्स बंगळुरु आणि (Royal Challengers Bangalore) दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडिमयवर समोरासमोर भिडतील.

हेही वाचा: मुंबईच्या प्ले-ऑफ सामन्याआधी फॅन्सना आठवतोय 'तो' खास सामना

सनरायझर्स हैदराबादचा संघ यापूर्वीच स्पर्धेतून बाहेर पडला आहे. दुसरीकडे मुंबई इंडियन्सच्या संघाला प्ले ऑफमध्ये पात्र होण्यासाठी मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागेल. कोलकाता नाईट रायडर्सचा संघ 14 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. त्यांचे नेट रनरेटही उत्तम आहे. जर मुंबई इंडियन्सने सामना जिंकला तर त्यांच्या खात्यात 14 गुण जमा होतील पण त्यांना प्ले ऑफमध्ये जागा मिळणार नाही. जर मुंबईने 170 + धावांनी हैदराबादला नमवले तरच मुंबई प्ले ऑफमध्ये धडक मारु शकतो.

हेही वाचा: KKRच्या विजयानंतर 'मुंबई इंडियन्स' ट्रोल; भन्नाट मीम्स व्हायरल

मुंबई आणि हैदराबाद यांच्यातील सामन्यात नाणेफेकीचा कौल मुंबईसाठी खूपच महत्त्वाचा आहे. अशक्यप्राय गोष्ट शक्य करण्यासाठी त्यांना पहिल्यांदा बॅटिंगच करावी लागले. जर त्यांनी टॉस जिंकला तर ते बॅटिंग करुन निर्धारित 20 षटकात मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करतील. दुसरीकडे हैदराबादने नाणेफेक जिंकली आणि त्यांनी पहिल्यांदा बॅटिंग केली तर मुंबई मैदानात उतरण्यापूर्वीच बाद होईल.

दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील सामनाच्या निकालाने प्ले ऑफमध्ये कोणताही बदल होणार नाही. दिल्लीचा संघ टॉपला आहे. दुसरीकडे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु तिसऱ्या क्रमांकावरच कायम राहिल.

loading image
go to top