esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai-Indians-Happy

कसा रंगला होता सामना, पाहा VIDEO

मुंबईच्या प्ले-ऑफ सामन्याआधी फॅन्सना आठवतोय 'तो' खास सामना

sakal_logo
By
विराज भागवत

Mumbai Indians Playoffs Qualification Equation: कोलकाता संघाने गुरूवारी राजस्थानविरूद्धच्या सामन्यात तब्बल ८६ धावांनी मोठा विजय मिळवला. या विजयासह कोलकाताने Top 4 मध्ये स्थान पटकावले. कोलकाताने शेवटचा साखळी सामना जिंकत १४ सामन्यात १४ गुणांसह आणि तगड्या नेट रनरेटसह चौथं स्थान गाठलं. त्यामुळे आता मुंबईच्या संघाला जर 'प्ले-ऑफ्स'ची फेरी गाठायची असेल, तर शेवटच्या साखळी सामन्यात मुंबईला भल्या मोठ्या फरकाने सनरायजर्स हैदाराबादच्या संघाला पराभूत करावेच लागेल.

हेही वाचा: Net Run Rate नेमकं काढतात कसे? IPL पाहणाऱ्यांसाठी गणिताची उजळणी

दरम्यान, कोलकाताचा संघ गुणतालिकेत १४ गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. त्यांचा नेट रनरेट +०.५८७ इतका आहे. तर मुंबईचे १३ सामन्यात १२ गुण असून त्यांचा नेट रनरेट -०.०४८ आहे. त्यामुळे मुंबईच्या संघाला प्ले ऑफ्सचं तिकीट मिळवायचं असेल तर त्यांना हैदराबाद विरूद्धचा सामना २००पेक्षा अधिक धावा काढून सुमारे १७१ धावांनी जिंकावा लागेल. याशिवाय, हैदराबादच्या संघाने प्रथम फलंदाजी घेतली, तर मुंबईचा पत्ता त्याच वेळी कट होईल. कारण त्या परिस्थितीत मुंबईच्या संघाला कितीही मोठं लक्ष्य असलं तरीही पहिल्याच षटकात गाठावं लागेल. या साऱ्या परिस्थितीनंतर मुंबईच्या चाहत्यांना दिल्लीविरूद्धचा 'तो' खास सामना आठवला. त्या सामन्यात मुंबईने २००पार मजल मारली होती आणि दिल्लीला ६६ धावांवर बाद केले होते.

हेही वाचा: मुंबईला 'प्ले ऑफ्स'चं तिकीट हवं असेल तर 'हे' आहे समीकरण

पाहा त्या खास सामन्याची झलक

हेही वाचा: KKRच्या विजयानंतर 'मुंबई इंडियन्स' ट्रोल; भन्नाट मीम्स व्हायरल

काय घडलं होतं त्यास सामन्यात?

IPL 2017 च्या हंगामातील ४५वा सामना मुंबई आणि दिल्ली यांच्यात रंगला होता. मुंबईच्या संघाने प्रथम फलंदाजी करत २० षटकात ३ बाद २१२ धावा केल्या होत्या. त्यात विंडिजच्या लेंडल सिमन्सच्या ६६ (४३) तर कायरन पोलार्डच्या नाबाद ६३ (३५) धावांचा समावेश होता. हार्दिक पांड्यानेही नाबाद २९ (१४) धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीच्या संघाला केवळ ६६ धावाच करता आल्या होत्या. कर्ण शर्माने ११ धावांत ३ बळी तर हरभजन सिंगने २२ धावांत ३ बळी घेत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता.

loading image
go to top