esakal | IPL 2021: हैदराबादच्या नटराजनच्या जागी संघात आला नवा खेळाडू
sakal

बोलून बातमी शोधा

SRH-Team

तीन दिवसांपूर्वीच नटराजनला झाली कोरोनाची लागण

IPL 2021: SRHच्या नटराजनच्या जागी संघात आला नवा खेळाडू

sakal_logo
By
विराज भागवत

IPL 2021 in UAE: दुबईमध्ये (Dubai) सुरु असलेल्या IPL स्पर्धेत कोरोनाने प्रवेश केला. सनरायजर्स हैदराबादचा (SRH) वेगवान गोलंदाज टी. नटराजन याला तीन दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली. नटराजनचा (Natarajan) RT-PCR रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. BCCIने ही माहिती दिली होती. नटराजन कोविड पॉझिटिव्ह असला तरी सध्या नटराजनमध्ये कोरोनाची लक्षणे नाहीत. खबरदारीचा उपाय म्हणून त्याने स्वत:ला आयसोलेशनमध्ये ठेवल्याचेही BCCIने सांगितलं होते. त्यानंतर आता, नटराजनच्या जागी हैदराबादच्या संघाने एक नवा खेळाडू संघात दाखल करून घेतला आहे. हैदराबाद संघाने छोट्या कालावधीसाठी उमरान मलिक या मध्यमगती गोलंदाजाला संघात समाविष्ट करून घेतले आहे.

हेही वाचा: IPL 2021: मुंबई संघावर तब्बल १३ वर्षांनी ओढवली 'ही' नामुष्की

नटराजनचा कोविड रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्याच्या जागी एका खेळाडूची निवड करणे गरजेचे होते. त्यासाठी हैदराबादच्या संघाने उमरान मलिक याला संधी दिली आहे. मलिकने जम्मू काश्मिरकडून एक टी२० सामना खेळला आहे. तर अ श्रेणी क्रिकेटमझ्ये काही सामने खेळले आहेत. उमरान याचा हैदराबादच्या नेट बॉलर्समध्ये समावेश होता. BCCI आणि IPLच्या नियमावलीतील ६.१ (c) या नियमाअंतर्गत बायो-बबलमध्ये असलेल्या अतिरिक्त खेळाडूंना मूळ संघात घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार, उमरान मलिकला संघात स्थान देण्यात आले आहे.

हेही वाचा: Video: बुमरा का जबाव नहीं! KKRच्या गिलची 'अशी' केली दांडी गुल

loading image
go to top