CSK vs DC : चेन्नईचा 91 धावांनी दणदणीत विजय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IPL 2022 Chennai Super Kings vs Delhi Capitals

CSK vs DC : चेन्नईचा 91 धावांनी दणदणीत विजय

मुंबई : चेन्नई सुपर किंग्जने दिल्ली कॅपिटल्सचा 91 धावांनी पराभव करत त्यांचे प्ले ऑफचे गणित अवघड करून टाकले आहे. चेन्नईने ठेवलेल्या 209 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीचा संपूर्ण संघ 117 धावात पॅव्हेलियनमध्ये गेला. सीएसकेकडून मोईन अलीने 3 तर सिमरजीत, ब्राव्हो आणि मुकेश चौधरी यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. दिल्लीकडून मार्शने सर्वाधिक 25 तर शार्दुल ठाकूरने 24 धावा केल्या. प्रथम फलंदाजी करणाऱ्या सीएसकेने डेवॉन कॉनवॉयच्या 87 आणि ऋतुराज गायकवाडच्या 48 धावांच्या जोरावर 208 धावा उभारल्या.

पाहा हायलाईट्स

99-8 : सिमरजीतने दिल्लीला दिला आठवा धक्का

सिमरजीने कुलदीप यादवला 5 धावांवर बाद करत दिल्लीला आठवा धक्का दिला.

85-7 : चौधरीने अक्षर - पॉवेलचा अडसर केला दूर 

निम्मा संघ माघारी गेल्यानंतर दिल्ली कॅपिटल्स अक्षर पटेलकडे आस लावून बसली होती. मात्र मुकेश चौधरीने त्याचा 1 धावेवर त्रिफळा उडवून दिला. त्यानंतर याच षटकाच्या 5 व्या चेंडूवर रोव्हमन पॉवेलला देखील 3 धावांवर बाद करत दिल्लीचा शेवटचा दर्जेदार फलंदाज माघारी धाडला.

81-5 : मोईन अलीचा डबल धमाका

मोईन अलीने 10 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर 21 धावा करणाऱ्या ऋषभचा त्रिफळा उडवला. त्यानंतर याच षटकाच्या चौथ्या चेंडूवर षटकार मारणाऱ्या रिपल पटेलला बाद करत दिल्लीची अवस्था 5 बाद 81 अशी केली.

72-3 : पंत - मार्श जोडी मोईन अलीने फोडली

दिल्लीचे मधल्या फळीतील फलंदाज मिशेल मार्श आणि ऋषभ पंत यांनी तिसऱ्या विकेटसाठी भागीदारी रचण्याचा प्रयत्न केला. मात्र मोईन अलीने 25 धावा करणाऱ्या मार्शला बाद करत ही जोडी फोडली.

36-2 : दिल्लीला मोठा धक्का 

महीश तिक्षाणाने दिल्लीला मोठा धक्का दिला. त्याने डेव्हिड वॉर्नरला 19 धावांवर बाद करत दिल्लीला पॉवर प्लेमध्येच दुसरा धक्का दिला.

16-1 : श्रीकार भारत बाद 

दिल्लीचा सलामीवीर श्रीकार भारत अवघ्या 8 धावा करून माघारी गेला. त्याला सिमरजीत सिंगने बाद केले.

धोनीच्या 8 चेंडूत 21धावा; सीएसकेने 20 षटकात 6 फलंदाजांच्या मोबदल्यात केल्या 208 धावा.

203-6 : नॉर्त्जेने दिले दोन धक्के

नॉर्त्जेने 20 व्या षटकात मोईन अलीला 9 तर रॉबिन उथप्पाला शुन्यावर बाद करत दोन धक्के दिले.

187-4 : खलील अहमदचा रायुडूला धक्का

खलील अहमदने सीएसकेचा अनुभवी फलंदाज अंबाती रायुडूला अवघ्या 5 धावांवर बाद केले.

170-3 : मार्शने संपवली दुबेची 32 धावांची खेळी

169-2 : कॉनवॉयचे शतक हुकले

डेवॉन कॉनवॉयने दमदार फलंदाजी करत सीएसकेच्या मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. मात्र खलील अहमदने त्याला 87 धावांवर बाद केले.

110-1 : सीएसकेला पहिला धक्का 

चेन्नई सुपर किंग्जला नॉर्त्जेने पहिला धक्का दिला. त्याने 33 चेंडूत 41 धावा करणाऱ्या ऋतुराज गायकवाडला बाद करत शतकी सलामी देणारी जोडी फोडली.

डेवॉन कॉनवॉयचे दमदार अर्धशतक

डेवॉन कॉनवॉयने आपला चांगला फॉर्म दिल्ली विरूद्धच्या सामन्यातही कामय ठेवला. त्याने दमदार अर्धशतक ठोकत ऋतुराज गायकवाड बरोबर शतकी सलामी दिली.

CSK 57-0 : चेन्नईची दमदार सुरूवात

चेन्नईचे सलामीवर डेवॉन कॉनवॉय आणि ऋतुराज गायकवाड यांनी पॉवर प्लेमध्ये चेन्नईला 57 धावांपर्यंत पोहचवले.