VIDEO | CSK vs PBKS : पंजाबच किंग! चेन्नईच्या पराभवाची मालिका सुरूच, पाहा Highlights

IPL 2022 Chennai Super Kings vs Punjab Kings 11th Match Live Cricket Score Highlights
IPL 2022 Chennai Super Kings vs Punjab Kings 11th Match Live Cricket Score Highlights ipl

पंजाबने चेन्नईचा केला 54 धावांनी पराभव; पाहा हायलाइट्स

121-9 : लास्ट मॅन स्टँडिंग फेम धोनी देखील गेला पॅव्हेलियनमध्ये

107-8 : राहुल चाहरने सीएसकेला दिला आठवा धक्का

सीएसकेचा प्रिटोरियस 8 धावा करून बाद

98-7 : लिव्हिंगस्टोनला हॅट्ट्रिकची संधी

लिव्हिंगस्टोनने 14 व्या षटकात शिवम दुबे आणि त्याच्या पुढच्याच चेंडूवर ड्वेन ब्राव्होला शुन्यावर बाद केले. 14 व्या षटकाच्या पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर दोन फलंदाज बाद केल्याने लिव्हिंगस्टोनला हॅट्ट्रिक करण्याची संधी आहे.

98-6 : लिव्हिंगस्टोनने सीएसकेच्या आशेवर फिरवले पाणी

धडाकेबाज फलंदाजी करून सीएसकेला हैराण करणाऱ्या लिव्हिंगस्टोनने शिवम दुबेची 57 धावांची खेळी संपवत गोलंदाजीतही मोठी कामगिरी केली.

36-5 : चेन्नईचा भरवशाचा रायुडू देखील पॅव्हेलिनमध्ये 

चेन्नई सुपर किंग्जचा डाव सावरण्याचा जबाबदारी असलेल्या अंबाती रायुडूला ओडेन स्मिथने 13 धावांवर बाद केले. रायुडू बाद झाल्यामुळे आता सीएसकेचा डाव सावरण्याची जबाबदारी धोनी आणि शिवम दुबेवर आली आहे.

23-4 : चेन्नईचा कर्णधार फोडू शकला नाही भोपळा

अर्शदीप सिंगने चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार रविंद्र जडेजाला शुन्यावर बाद करत चेन्नईची अवस्था 4 बाद 23 अशी केली.

22-3 : वैभव अरोराने सीएसकेच्या बॅटिंगला पाडले खिंडार

पंजाब किंग्जच्या वैभव अरोराने आपल्या पहिल्याच आयपीएल सामन्यात नवीन चेंडूवर भेदक मारा केला. त्याने चेन्नईच्या रॉबिन उथप्पा बरोबरच मोईन अलीला देखील बाद केले.

14-2 : वैभव अरोरानं चेन्नईला दिला आणखी एक धक्का

वैभव अरोराला यश; सलामीवीर रॉबिन उथप्पाही 10 चेंडूत 13 धावा करुन तंबूत; मयांक अग्रवालनं घेतला झेल

10-1 : चेन्नईला पहिला धक्का; ऋतूराज पुन्हा फेल

ऋतूराज गायकवाड पुन्हा फेल, अवघ्या एका धावेची भर घालून परतला तंबूत, रबाडाच्या गोलंदाजीव शिखर धवनने घेतला कॅच

180-8 (20 Ov): पंजाबने मारली 180 पर्यंत मजल

लिम लिव्हिंगस्टोन 60 धावा करून बाद झाल्यानंतर पंजाबची धावगती मंदावली. चेन्नईच्या गोलंदाजांनी 15 षटकात 150 धावा करणाऱ्या पंजाबला 20 षटकात 8 बाद 180 धावांपर्यंत रोखले. चेन्नईकडून जॉर्डन आणि प्रेटोरियसने भेदक मारा करून प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.

151-6 : शाहरूख खान काही 'हिट' होईना

मुश्ताक अली ट्रॉफीत आपल्या फटकेबाजीने धुमाकूळ घालणाऱ्या शाहरूख खानला आयपीएलमध्ये काही सूर सापडत नाहीये. आजच्या सामन्यात तो 11 चेंडूत फक्त 6 धावा करून ख्रिस जॉर्डनच्या गोलंदाजीवर बाद झाला.

146-5 : जितेश शर्मा स्मार्टनेस फसला

जितेश शर्माने प्रेटोरियसला स्कूप शॉट मारण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रेटोरियसने शर्माची चाल ओळखली आणि आपल्या चेंडूतील गती कमी केली. त्यामुळे शर्मा उथप्पाकडे झेल देण्यास भाग झाला. जितेश शर्माने 17 चेंडूत 26 धावा केल्या.

115-4 : अर्धशतक ठोकणाऱ्या लिव्हिंगस्टोनची जडेजाने केली शिकार

रविंद्र जडेजाने 60 धावा करणाऱ्या लिव्हिंगस्टोनला बाद करत पंजाबला चौथा धक्का दिला. शिखर पाठोपाठ दुसरा सेट बॅट्समन देखील बाद झाला.

109-3 : ब्रोव्होने जमलेली जोडी फोडली

शिखर धवन आणि लिम लिव्हिंगस्टोनने तिसऱ्या विकेटसाठी केलेली 95 धावांची भागीदारी ड्वेन ब्राव्होने फोडली. त्याने शिखर धवनला 33 धावांवर बाद केले.

14-2 : भानुका राजपक्षे धावबाद 

सामन्याचा पहिला षटकार मारणारा भानुका राजपक्षे 9 धावांवर धावबाद झाला. पंजाबला पॉवर प्लेमध्येच दोन धक्के बसले.

4-1 : पंजाबला पहिला धक्का; कर्णधार मयांक अग्रवाल बाद

चेन्नई सुपर किंग्जच्या मुकेश चौधरीने सामन्याच्या दुसऱ्याच चेंडूवर पंजाबचा कर्णधार मयांक अग्रवालला 4 धावांवर बाद केले. मुकेशच्या पहिल्या चेंडूवर चौकार मारणारा मयांक दुसऱ्याच चेंडूवर बाद झाला.

चेन्नईच्या संघात एक बदल

चेन्नई सुपर किंग्जने आपल्या संघात एक बदल केला असून तुषार देशपांडेच्या जागी ख्रिस जॉर्डनला संघात संधी देण्यात आली आहे.

चेन्नईच्या पराभवाची मालिका सुरूच

चेन्नई सुपर किंग्जची आयपीएलच्या 15 व्या हंगामातील पराभवाची मालिका तिसऱ्या सामन्यातही सुरूच राहिली. पंजाब किंग्जने चेन्नईचा 54 धावांनी पराभव करत आपला हंगामातील दुसरा विजय साजरा केला. पंजाबने प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 8 बाद 180 धावा केल्या होत्या. त्याच्या प्रत्युत्तरात चेन्नईचा डाव 18 षटकात 126 धावात आटोपला.

पंजाबच्या लिम लिव्हिंगस्टोनने दमदार कामगिरी करत फलंदाजीत 60 धावांचे तर गोलंदाजीत 2 विकेट घेऊन योगदान दिले. पंजाबकडून वैभव अरोरा, राहुल चाहरने चांगला मारा केला. राहुल चाहरने 3 तर अरोराने 2 विकेट घेतल्या. चेन्नईकडून शिवम दुबेने 57 धावांची खेळी केली. मात्र मोक्याच्या क्षणी तो बाद झाला.

दोन बदलासह पंजाब उतरणार मैदानात

पंजाबने आपल्या संघात दोन बदल केले आहेत. जितेश शर्मा आणि वैभव अरोरा यांना संधी.

चेन्नईने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजीचा निर्णय

चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार रविंद्र जडेजाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. चेन्नईने अजून आपले विजयाचे खाते उघडलेले नाही. आजच्या सामन्यात ते पहिल्या विजयाची प्रतिक्षा संपवणार का हे पाहणे महत्वाचे ठरेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com