CSK च्या पराभवानंतर रैनाचा फोटो तर जडेजाचा व्हिडिओ व्हायरल

Ravindra Jadeja And Sures Raina
Ravindra Jadeja And Sures RainaSakal

IPL 2022 : आयपीएलच्या 15 व्या हंगामाच्या सुरुवातीला चेन्नई सुपर किंग्जनं (CSK) नेतृत्वात केलेली खांदे पालट संघाला चांगलीच अडचणीत आणणारी ठरतीये. सनरायझर्स हैदराबाद (SRH) विरुद्धच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जला सलग चौथ्या पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवानंतर संघाचा कर्णधार रविंद्र जडेजाचा (Ravindra Jadeja) एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. काही जणांनी तर कॉमेंट्री बॉक्समध्ये बसलेल्या सुरेश रैनाचा (Suresh Raina) फोटो शेअर करत त्याची उणीव भासत असल्याची भावना व्यक्त केली आहे.

ट्विटरवर रविंद्र जडेजाची एक छोटी क्लिप व्हायरल होत आहे. यात तो आपल्या हाताची चार बोटे नाचवताना दिसतोय. चेन्नईचा चौथ्या पराभवाचा दाखला देत नेटकरी त्याला या क्लिपसह ट्रोल करत आहेत. मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने पहिल्यांदा बॅटिंग केली. निर्धारित 20 षटकात त्यांना 154 धावापर्यंतच मजल मारता आली होती.

Ravindra Jadeja And Sures Raina
व्वा रे पठ्ठ्या... पृथ्वीराजनं 45 सेकंदात मारली मुंसडी; पाहा फोटो

या धावांचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबाद संघाच्या सलामीवीरांनी दमदार सुरुवात केली. कर्णधार केन विल्यमसन 32 (40) माघारी फिरल्यानंतर सलामीवीर अभिषेक शर्मानं 50 चेंडूत 75 धावांची खेळी केली. राहुल त्रिपाठीनं 15 चेंडूत नाबाद 39 धावांची खेळी करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. हैदराबादने 8 गडी आणि `14 चेंडू राखून सामना खिशात घातला.

Ravindra Jadeja And Sures Raina
CSK vs SRH : चेन्नईचा पराभवाचा चौकार; हैदराबादने खाते उघडले

गतविजेता आणि चारवेळा आयपीएल स्पर्धेचे जेतेपद मिळवलेल्या चेन्नई सुपर किंग्जची यंदाच्या हंगामातील कामगिरी ही निराशजनक आहे. चेन्नईने मेगा लिलावाआधी आयपीएल स्पेशलिस्ट रैनाला रिलीज केले. चेन्नईचा संघ लिलावात त्याला पुन्हा आपल्या ताफ्यात घेईल, असे वाटत होते. पण तसे झाले नाही. रैना अनसोल्ड राहिला. कोणत्याही फ्रेंचायझीकडून भाव न मिळाल्याने निराश न होता रैनाने आपली नवी इनिंग सुरु केली. आयपीएलच्या काॅमेंट्री पॅनलमध्ये तो सहभागी झालाय. चेन्नईच्या चौथ्या पराभवानंतर रैनाचा कॉमेंट्री करतानाचा फोटो व्हायरल होताना दिसतोय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com