DC vs RR : 222 धावा करणाऱ्या राजस्थानला दिल्लीने घाम फोडला; पाहा Highlights | IPL 2022 Delhi Capitals vs Rajasthan Royals | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IPL 2022 Delhi Capitals vs Rajasthan Royals

DC vs RR : 222 धावा करणाऱ्या राजस्थानला दिल्लीने घाम फोडला; पाहा Highlights

पॉवेलने राजस्थानला भरवली होती धडकी मात्र अखेर राजस्थानने विजय मिळवलाच. पाहा हायलाईट्स 

187-7 : ललित यादवचा 24 चेंडूत 37 धावांचा कॅमियो प्रसिद्ध कृष्णाने संपवला.

ललित यादवची फटकेबाजी, राजस्थानचे वाढले टेन्शन

157-6 : लॉर्ड शार्दुल बाद

अक्षर पटेल पाठोपाठ शार्दुल ठाकूर देखील 10 धावा करून बाद झाला.

127-5 : दिल्लीचा निम्मा संघ माघारी

युझवेंद्र चहलने अक्षर पटेलचा (1) त्रिफळा उडवत दिल्लीचा पाचवा फलंदाज माघारी धाडला.

124-4 : प्रसिद्ध कृष्णाला मोठे यश

24 चेंडूत 44 धावा करणारा ऋषभ पंतला प्रसिद्ध कृष्णाने गळाला लावले. युझवेंद्र चहलने याच षटकात त्याचा झेल सोडला होता. मात्र 12 व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर प्रसिद्ध कृष्णाने पंतला बाद केले.

99-3 : अश्विनचा दिल्लीला मोठा धक्का

वानखेडेच्या पाटा विकेटवर आर अश्विनने प्रभावी मारा करत दिल्लीचा सेट झालेला सलामीवीर पृथ्वी शॉला 37 धावांवर बाद केले.

48-2 : सर्फराज आल्या पावली परतला

दिल्लीचा सर्फराज खान फक्त 1 धावेची भर घालून परतला. त्याला आर. अश्विनने बाद केले.

43-1 : प्रसिद्धने केली वॉर्नरची शिकार

राजस्थानने विजयासाठी ठेवलेल्या 223 धावांचा पाठलाग करताना दिल्लीचे सलामीवीर पृथ्वी शॉ आणि डेव्हिड वॉर्नर यांनी चांगली सुरूवात करण्याचा प्रयत्न केला. मात्र ही जोडी प्रसिद्ध कृष्णाने फोडली. त्याने वॉर्नरला 28 धावांवर बाद केले.

222-2 (20 Ov) : संजूनेही हात धुवून घेतले

धावांच्या वाहत्या गंगेत बटलरनंतर संजू सॅमसनने देखील 19 चेंडूत नाबाद 46 धावा करत हात धुवून घेतला.

202-2 : राजस्थानला द्विशतकी मजल मारून देत बटलर बाद

राजस्थानला 19 व्या षटकातच 200 चा टप्पा पार करून देणाऱ्या जॉस बटलरची 65 चेंडूत 116 धावांची शतकी खेळी अखेर मुस्तफिजूरने संपवली.

जॉस बटलरचा शतकी धुमधडाका

हंगामात जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या जॉस बटलरने आपले हंगमातील तिसरे शतक ठोकले.

पडिक्कलचेही अर्धशतक 

राजस्थानचा दुसरा सलामीवीर देवदत्त पडिक्कलने अर्धशतक ठोकले. बटलर आणि पडिक्कलने संघाला 155 धावांची सलामी दिली.

RR 104/0 (11) : पडिक्कल आणि बटलरची शतकी सलामी

राजस्थानचे सलामीवीर जॉस बटलर आणि देवदत्त पडिक्कलने दिल्ली विरूद्ध धडाकेबाज फलंदाजी करत 11 षटकात 104 धावांपर्यंत मजल मारून दिली.

जॉस बटलरचे फायर वर्क सुरूच

यंदाच्या आयपीएलमध्ये ड्रीम फॉर्ममध्ये असलेल्या जॉस बटलरने दिल्ली विरूद्धच्या सामन्यात देखील अर्धशतकी खेळी केली.

RR 44-0 : राजस्थानची आश्वासक सुरूवात 

राजस्थानचे सलामीवीर देवदत्त पडिक्कल आणि जॉस बटलरने पॉवर प्लेमध्ये 44 धावा करत राजस्थानला आश्वासक सुरूवात करून दिली.

दिल्लीने नाणेफेक जिंकली.

दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघांनी आपल्या विनिंग कॉम्बिनेशनमध्ये कोणताच बदल केलेला नाही.

दिल्लीने शेवटी दम दाखवला मात्र 15 धावा पडल्या कमी 

मुंबई : शेवटच्या षटकात दिल्लीला विजयासाठी 35 धावांची गरज असताना रोव्हमन पॉवेलने पहिल्या तीन चेंडूवर तीन षटकार मारत राजस्थानचा बीपी वाढवला होता. मात्र अखेर मॅकोयने शेवटचे तीन चेंडू चांगले टाकत राजस्थानला सामना जिंकून दिला. राजस्थानचे 223 धावांचे आव्हान पार करताना दिल्लीने 20 षटकात 8 बाद 207 धावांपर्यंत मजल मारून दिली. दरम्यान, या सामन्यात देखील अंपायरिंगवरून वाद झाल्याचे दिसले. राजस्थानकडून जॉस बटलरने धडाकेबाज फलंदाजी करत 116 धावांची शतकी खेळी केली.

Web Title: Ipl 2022 Delhi Capitals Vs Rajasthan Royals 34th Match Live Cricket Score Highlights

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top