
MI vs GT : मुंबईने गुजरातला अखेरच्या चेंडूवर पाजले पाणी - Highlights
मुंबई : अटीतटीच्या सामन्यात मोक्याच्या क्षणी मुंबईने आपला खेळ उंचावला. गुजरातला शेवटच्या षटकात 9 धावांची गरज असताना डॅनियल सॅम्सने फक्त 3 धावा देत मुंबईला विजय मिळवून दिला. मुंबईने गुजरासमोर 178 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र गुजरातला 20 षटकात 5 बाद 172 धावांपर्यंतच मजल मारता आली. गुजरातकडून वृद्धीमान साहाने सर्वाधिक 55 धावा केल्या. त्याला शुभमन गिलने 52 धावा करून चांगली साथ दिली. या दोघांनी 106 धावांची सलामी दिली. मात्र मुंबईच्या गोलंदाजांनी मोक्याच्या क्षणी खेळ उंचवला आणि सामना जिंकून दिला. मुंबईकडून मुर्गन अश्विनने दोन तर पोलार्डने 1 विकेट घेतली.
पाहा शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्याचे हायलाईट्स
156-4 : मोक्याच्या क्षणी पांड्या धावबाद
14 चेंडूत 24 धावा करणाऱ्या पांड्याला इशान किशनने मोक्याच्यावेळी धावाबाद केले. पांड्या बाद झाला त्यावेळी गुजरातला 14 चेंडूत 22 धावांची गरज होती.
138-3 : पोलार्डने साई सुदर्शनला 14 धावांवर केले बाद
111-2 : मुर्गनचा डबल धमाका
मुर्गन अश्विनने 13 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर 52 धावांवर शुभमन गिलला बाद केले. तर 6 व्या चेंडूवर 55 धावा करणाऱ्या वृद्धीमान साहाला बाद करत दुसरा सलामीवीर देखील माघारी धाडला.
106-1 : शतकी सलामीनंतर जोडी फुटली.
शुभमन गिलने अर्धशतक (52) ठोकून वृद्धीमान साहा बरोबर 106 धावांची सलामी दिली. साहानेही आपले अर्धशतक पूर्ण केले. अखेर ही जोडी मुर्गन अश्विनने फोडली.
GT 54-0 : गुजरातची दमदार सुरूवात
मुंबईचे 178 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या गुजरात टायटन्सने दमदार सुरूवात केली. सलामीवीर शुभमन गिल आणि वृद्धीमान साहाने पॉवर प्लेमध्ये नाबाद 54 धावा केल्या.
टीम डेव्हिडचे नाबाद 44 धावांची खेळी, मुंबईच्या 20 षटकात 6 बाद 177 धावा
मुंबईने गुजरात टायटन्ससमोर 177 धावांचे आव्हान ठेवले. मुंबईकडून इशान किशनने सर्वाधिक 45 धावांची खेळी केली. रोहित शर्माने देखील आक्रमक सुरूवात करत 43 धावांची खेळी केली. तर टीम डेव्हिडने देखील तिलर वर्मासोबत भागीदारी रचत मुंबईला 150 च्या पार पोहचवले. त्याने 21 चेंडूत नाबाद 44 धावांची खेळी केली. यामुळे मुंबईला 177 धावांपर्यंत मजल मारता आली.
164-6 : डॅनियल सॅम्स शुन्यावर बाद
157-5 : तिलक वर्मा बाद, भागीदारी रचणारी जोडी फुटली.
119-4 पोलार्डकडून निराशा
111-3 : इशान किशन देखील अर्धशतकाविना माघारी
रोहित शर्मा पाठोपाठ इशान किशन देखील अर्धशतक पूर्ण होण्यापूर्वीच बाद झाला. त्याला अल्झारी जोसेफने 45 धावांवर बाद केले.
99-2 : सांगवानने केली सूर्यकुमारची शिकार
प्रदीप सांगवानने मुंबईचा फॉर्ममध्ये असलेला फलंदाज सूर्यकुमार यादवला 13 धावांवर बाद करत मुंबईला दुसरा धक्का दिला.
74-1 : दमदार सुरूवातीनंतर मुंबईला पहिला धक्का
मुंबईचे सलामीवीर रोहित शर्मा आणि इशान किशन अनेक सामन्यानंतर आज चांगल्या लयीत दिसत होते. या दोघांनी 8 षटकात 74 धावांची सलामी दिली होती. यात रोहितच्या 28 चेंडूत केलेल्या 43 धावांचा मोठा वाटा होता. मात्र राशिद खानने ही जोडी फोडली. त्याने रोहितला अर्धशतक पूर्ण करू दिले नाही.
मुंबईच्या संघात एक बदल
मुंबईने आपल्या संघात एक बदल केला असून मुर्गन अश्विन संघात परतला आहे. तो ऋतिक शौकीनची जागा घेईल.
गुजरातने नाणेफेक जिंकली
गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
Web Title: Ipl 2022 Gujarat Titans Vs Mumbai Indians 51st Match Live Cricket Score Highlights
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..