GT vs PBKS : गुजरातचा दुसरा पराभव; पंजाब विनिंग ट्रॅकवर| IPL 2022 Gujarat Titans vs Punjab Kings | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IPL 2022 Gujarat Titans vs Punjab Kings

GT vs PBKS : गुजरातचा दुसरा पराभव; पंजाब विनिंग ट्रॅकवर

मुंबई : अखेर गुजरातची सलग पाच विजयांची मालिका पंजाबने खंडीत केली. पंजाबने गुजरात टायटन्सचे 144 धावांचे आव्हान 16 षटकात 2 फलंदाजांच्या मोबदल्यातच पार केले. पंजाब किंग्जकडून सलामीवीर शिखर धवनने 62 धावांनी दमदार खेळी केली. तर लिम लिव्हिंगस्टोनने 10 चेंडूत 30 धावांची खेळी करत सामना लवकर संपवला.

97-2 : लॉकी फर्ग्युसनने दिला पंजाबला दुसरा धक्का

लॉकी फर्ग्युसनने पंजाबला दुसरा धक्का दिला. त्याने भानुका राजपक्षेला 40 धावांवर बाद केले.

शिखर धवनचे दमदार शतक

शिखर धवनने दमदार फलंदाजी करत अर्धशतक ठोकले. त्याने भानुका राजपक्षेसोबत दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी रचली.

साई सुदर्शनची झुंजार खेळी 

गुजरातचे एका पाठोपाठ एक फलंदाज माघारी जात असताना साई सुदर्शनने झुंजार खेळी करत 50 चेंडूत 65 धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावरच गुजरात टायटन्सने 20 षटकात 8 बाद 143 धावांपर्यंत पोहचवले.

112-6 : रबाडाने फिनिशरनां एकाच षटकात केले ढेर

कसिगो रबाडाने 17 व्या षटकात गुजरातच्या राहुल तेवतिया (11) आणि राशिद खानला (0) बाद करत पाठोपाठ दोन धक्के दिले.

67-4 : किलर मिलरने देखील सोडली साथ

गुजरातचा फॉर्ममध्ये असलेल्या डिव्हिड मिलरला लिम लिव्हिंगस्टोनने 11 धावांवर बाद केले.

44-3 : हार्दिक पांड्या स्वस्तात माघारी

हार्दिक पांड्याला ऋषी धवनने अवघ्या 1 धावेवर बाद करत गुजरातला तिसरा आणि मोठा धक्का दिला.

34-2 : गुजरातचे दोन्ही सलामीवीर माघारी

गुजरातचे दोन्ही सलामीवीर 34 धावांवर माघारी गेले. शुभमन गिल 9 धावांवर धावबाद झाला. तर 21 धावा करणाऱ्या वृद्धीमान साहाला रबाडाने बाद केले.

गुजरातचा गोलंदाजीचा निर्णय

गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

Web Title: Ipl 2022 Gujarat Titans Vs Punjab Kings 48th Match Live Cricket Score Highlights

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top