IPL 2022 Gujarat Titans Squad : 'नया है वह'; तेवतियाचे तेवर!

IPL 2022 Gujarat Titans Squad
IPL 2022 Gujarat Titans Squad Gujarat Titans Twitter

IPL 2022 Gujarat Titans Squad : आयपीएलच्या आगामी हंगामातून एन्ट्री मारण्यासाठी सज्ज असलेल्या गुजरात टायटन्सने मेगा लिलावात न्यूझीलंडचा जलदगती गोलंदाज लॉकी फर्ग्युसन आणि अनकॅप्ड राहुल तेवतियावर मोठा डाव खेळला. फर्ग्युसनसाठी त्यांनी बटव्यातून तब्बल 10 कोटी खर्च केले. तर 40 लाख मूळ किंमत असलेल्या राहुल तेवतियावर 9 कोटींची बरसात केली. सनरायझर्सच्या ताफ्यात दिसलेल्या जेसन रॉयला त्यांनी 2 कोटीच्या बेस प्राइजमध्ये आपल्या ताफ्यात सामील करुन घेतल. तर पंजाब किंग्जकडून खेळलेला आणि भारतीय संघातील प्रमुख गोलंदाज असलेल्या मोहम्मद शमीसाठी त्यांनी 6.25 कोटी खर्च केले. (IPL 2022 Hardik Pandya Gujarat Titans Squad After IPL Mega Auction)

आयपीएलच्या मेगा लिलावापूर्वी जुन्या संघांना 4 खेळाडू रिटेन करण्याची संधी होती. दुसरीकडे नव्या फ्रँचायझींना लिलावाआधी तीन खेळाडू निवडण्याची मुभा देण्यात आली होती. अहमदाबाद फ्रँचायझीच्या गुजरात टायटन्सनं मुंबई इंडियन्समुळे स्टार झालेल्या हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात घेऊन त्याच्या खांद्यावर कर्णधाराची धूरा दिली. त्याच्याशिवाय त्यांनी राशीद खान आणि शुभमन गिल यांच्यावर मोठा डाव खेळला होता.

IPL 2022 Gujarat Titans Squad
IPL 2022 Auction: गंभीरनं डोकं लावलं अन् लखनौनं फिरकीचं जाळ विणलं!

लिलावाआधी घेतलेले खेळाडू

हार्दिक पांड्या (15 कोटी)

राशिद खान (15 कोटी)

शुबमन गिल (8 कोटी)

IPL 2022 Gujarat Titans Squad
अंबानींच्या पोराचा हात खालीच येईना; जोफ्रासासाठी टेबलवर तगडी फाईट; अन्...

लिलावात कोणत्या खेळाडूला किती रुपये घेऊन घेतलं संघात

मोहम्मद शमी (Mohammad Shami) Indian Bowler ₹6,25,00,000

डेविड मिलर (David Miller) Overseas Batsman ₹3,00,00,000

जेसन रॉय (Jason Roy) Overseas Batsman ₹2,00,00,000

वृद्धिमान साहा (Wriddhiman Saha) Indian Wicket Keeper ₹1,90,00,000

मेथ्यू वेड (Matthew Wade) Overseas Wicket Keeper ₹2,40,00,000

लॉकी फर्ग्युसन (Lockie Ferguson) Overseas Bowler ₹10,00,00,000

अभिनव सदारंगनी (Abhinav Sadarangani) Indian Batsman ₹2,60,00,000

राहुल तेवतिया (Rahul Tewatia) Indian All-Rounder ₹9,00,00,000

नूर अहमद (Noor Ahmad) Overseas Bowler ₹30,00,000

आर साई किशोर (R. Sai Kishore) Indian Bowler ₹3,00,00,000

डॉमिनिक ड्रॅक्स (Dominic Drakes) Overseas All-Rounder ₹1,10,00,000

विजय शंकर (Vijay Shankar) Indian All-Rounder ₹1,40,00,000

जयंत यादव (Jayant Yadav) Indian All-Rounder ₹1,70,00,000

दर्शन नलकांडे (Darshan Nalkande) Indian All-Rounder ₹20,00,000

यश दायल (Yash Dayal) Indian Bowler ₹3,20,00,000

बी साई सुदर्शन (B. Sai Sudharsan) Indian All-Rounder ₹20,00,000

गुरुकिरत सिंग (Gurkeerat Singh) Indian All-Rounder ₹50,00,000

अल्झारी जोसेफ (Alzarri Joseph) Overseas Bowler ₹2,40,00,000

वरुन एरॉन (Varun Aaron) Indian Bowler ₹50,00,000

प्रदीप सांगवान (Pradeep Sangwan Indian) All-Rounder ₹20,00,000

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com