IPL 2022: केन विल्यमसने केल्या 17 धावा; पण तरीही झाला खास रेकॉर्ड... | Kane Williamson Record | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kane williamson record

IPL 2022: केन विल्यमसने केल्या 17 धावा; पण तरीही झाला खास रेकॉर्ड...

IPL 2022 : आयपीएलच्या या हंगामात खराब सुरुवात करत आता सनरायझर्स हैदराबाद (SRH) पुन्हा विजयी मार्गावर आले आहे. हैदराबादने पहिले दोन सामने हरले होते, पण आता सलग तीन सामने जिंकले आहे. हैदराबाद संघाने शुक्रवारीच कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) 7 विकेट राखून पराभव केला. कोलकाता संघाने या सामन्यात हैदराबादला 176 धावांचे लक्ष्य दिले होते. हैदराबादने या सामन्यात चांगली अशी फलंदाजी करत हा सामना जिंकला, पण संघाचा कर्णधार केन विल्यमसन काही खास खेळी करू शकला नाही. तो अवघ्या 17 धावा करून बाद झाला. जरी त्याने केवळ 17 धावा केल्या आसल्या तरी विल्यम्सने एक विशेष असा विक्रम आपल्या नावावर केला आहे.(Kane Williamson Record IPL2022)

हेही वाचा: IPL 2022: आंद्रे रसेलची अष्टपैलू कामगिरी व्यर्थ; कोलकाता-हैदराबाद सामन्यातील 5 महत्त्वाचे क्षण

केन विल्यम्सने सनरायझर्स हैदराबाद संघाकडून खेळताना आयपीएलमध्ये 2000 धावा पूर्ण केल्या आहेत. अशी कामगिरी करणारा तो तिसरा खेळाडू ठरला आहे. त्याच्याआधी डेव्हिड वॉर्नर आणि शिखर धवन यांनी हैदराबाद संघासाठी ही कामगिरी केली आहे. या हंगामात शिखर धवन पंजाब किंग्जकडून खेळत आहे, तर वॉर्नर दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळत आहे.

KKR विरुद्धच्या सामन्यानंतर विल्यमसनने हैदराबाद संघासाठी एकूण 2009 धावा केल्या आहेत. शिखर धवनने 2518 धावा केल्या तर, यामध्ये वॉर्नर अव्वल स्थानावर आहे. हैदराबाद संघासाठी डेव्हिड वॉर्नरने 4014 धावा केल्या होत्या. वॉर्नरने त्याच्या नेतृत्वाखाली 2016 मध्ये एकदा सनरायझर्स संघाला विजयही मिळवून दिला आहे.

हेही वाचा: IPL 2022: डेव्हिड वॉर्नर बनला KGF 2 चा रॉकी...

सामन्याबदल बोलायचं झालं तर, सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर कोलकाता संघाने 8 गड्या बाद 175 धावा केल्या. नितीश राणाने 36 चेंडूत सर्वाधिक 54 धावा केल्या. आंद्रे रसेलने 25 चेंडूत 49 धावा केल्या. प्रत्युत्तरात देताना सनरायझर्स संघाने 3 गडी गमावून 176 धावा करत सामना एक हाती जिंकला. संघाकडून राहुल त्रिपाठीने 37 चेंडूत 71 धावा केल्या, तर एडन मार्कराम 36 चेंडूत 68 धावा करून नाबाद राहिला.

Web Title: Ipl 2022 Kane Williamson Most Runs For Sunrisers Hyderabad Team Srh Vs Kkr Record Sports

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..