esakal | KL राहुल प्रितीला अलविदा करणार? काव्या मारन मोठी बोली लावणार| KL Rahul
sakal

बोलून बातमी शोधा

KL राहुल प्रितीला अलविदा करणार? काव्या मारन मोठी बोली लावणार

KL राहुल प्रितीला अलविदा करणार? काव्या मारन मोठी बोली लावणार

sakal_logo
By
सुशांत जाधव

आयपीएलच्या 14 व्या हंगामात पंजाब किंग्जचा संघ नाव बदलून उतरला पण त्यांचा खेळात काही सकारात्मक बदल दिसला नाही. यंदाच्या हंगामातही लोकेश राहुल एकटा लढत होता. अन् बाकीचे नावाला खेळताना दिसले. परिणामी त्यांना पुन्हा एकदा साखळी फेरीनंतर घरचा रस्ता धरावा लागला. सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत असूनही संघाचा प्रवास प्ले ऑफच्या आधी संपुष्टात आल्यानंतर लोकेश राहुलच आपला मार्ग बदलणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. क्रिकबझच्या वृत्तानुसार आगामी लिलावापूर्वी तो पंजाब किंग्जपासून वेगळा होण्याचा विचार करत आहे.

प्रिती झिंटा हिच्या मालकीच्या संघाला अलविदा केल्यानंतर लोकेश राहुल कोणत्या संघातून खेळताना दिसेल, अशा चर्चांनाही आता उधाण आले आहे. प्रसारमाध्यमात रंगणाऱ्या चर्चेनुसार आयपीएल 2022 च्या मेगा लिलावात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, शाहरुख खानचा कोलकाता नाईट रायडर्स आणि काव्या मारण हैदराबाद संघात त्याला घेण्यासाठी खटाटोप करताना दिसू शकतात.

हेही वाचा: T20: राशिदने निवडले Top 5 खेळाडू; धोनी, रोहितला स्थान नाही !

आयपीएलच्या आगामी लिलावासंदर्भात फ्रेंचायझींनी रिटेंशनसंदर्भात अद्याप कोणतीही घोषणा केलेली नाही. आयपीएलमधील नियमावलीनुसार, प्रत्येक संघ 3 खेळाडूच रिटेन करु शकतो. बाकी खेळाडूंना पुन्हा एकदा लिलावात उतरावे लागले. लोकेश राहुलने यंदाच्या हंगामात 13 सामन्यात 62.60 च्या सरासरीने 626 धावा केल्या आहेत. सध्याच्या घडीला ऑरेंज कॅप त्याच्याकडेच आहे. केएल राहुल 2018 पासून पंजाबच्या ताफ्यातून खेळताना दिसत आहे. जेव्हापासून तो पंजाबकडून खेळतोय तेव्हापासून प्रत्येक हंगामात त्याने 500 + धावा केल्या आहेत.

हेही वाचा: RCBचं कर्णधारपद सोडल्यानंतर विराट झाला भावूक, म्हणाला

विराट कोहलीने RCB संघाचे नेतृत्व सोडले आहे. दुसरीकडे काव्या मारण यांच्या सह मालकीचा सनरायझर्स हैदराबादचा संघ नव्या नेतृत्वाच्या शोधात आहे. या दोन संघाच्या नजरा लोकेश राहुलवर असतील. शाहरुख खानचा कोलकाना नाईट रायडर्सही राहुलवर नजरा ठेऊन असेल. परदेशी कर्णधारांच्या नेतृत्वाखाली हैदराबादला विशेष छाप सोडता आलेली नाही. त्यामुळे आगामी हंगामा संघ बांधणी करताना भारतीय कर्णधारासह मैदानात उतरण्याचा ऑरेंज आर्मीचा गेम प्लॅन असेल. त्यामुळे काव्या मारन यांनी राहुलसाठी मोठी रक्कम मोजली तर नवल वाटणार नाही.

loading image
go to top