
LSG vs KKR : लखनौचा 75 धावांनी दणदणीत विजय; केकेआरचे पॅक अप?
पुणे : लखनौ सुपर जायंटचे 177 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या कोलकाता नाईट रायडर्सला लखनौ सुपर जायंटच्या गोलंदाजांनी 101 धावांवर डाव गुंडळला. लखनौने केकेआरवर 75 धावांनी दणदणीत विजय मिळवत गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले. केकेआरकडून आंद्रे रसेलने 45 धावा करत एकाकी झुंज दिली. तर लखनौकडून आवेश खान आणि जेसन होल्डरने प्रत्येकी 3 विकेट घेतल्या.
99-9 होल्डर हॅट्ट्रिक चान्सवर
जेसन होल्डरने सुनिल नारायण आणि टीम साऊदीला पाठोपाठ बाद करत हॅट्ट्रिक चान्स निर्माण केला होता. मात्र 10 वा फलंदाज चमीरा धावबाद झाला.
85-7 : अनुकूल रॉय भोपळाही न फोडता माघारी
85-6 : आवेश खानने रसेलची धडपड संपवली
निम्मा संघ माघारी गेला असताना आंद्रे रसेलने 45 धावांची खेळी करून झुंज देण्याचा प्रयत्न केला. मात्र हा प्रयत्न आवेश खानने संपवला.
25-4 : नितीश राणा अवघ्या 2 धावा करून बाद
केकेआरची अवस्था 3 बाद 23 धावा झाली असताना अवघ्या 2 धावांची भर घालून इन फॉर्म बॅट्समन नितीश राणा माघारी परतला. त्याला आवेश खानने बाद केले.
23-3 : फिंच पुन्हा एकदा फेल
11-2 : श्रेयस अय्यर बाद
दुष्मंथा चमीराने केकेआरला दुसरा आणि मोठा धक्का दिला. त्याने कर्णधार श्रेयस अय्यरला 6 धावांवर बाद केले.
0-1 : लखनौप्रमाणे केकेआरलाही पहिल्याच षटकात पहिला धक्का
लखनौचा कर्णधार केएल राहुल पहिल्याच षटकात बाद झाला होता. त्यानंतर केकेआरचा सलामीवीर बाबा अपराजीत देखील पहिल्याच षटकात सहाव्या चेंडूवर भोपळाही न फोडता माघारी गेला. त्याला मोहसीन खानने बाद केले.
176-7 : 20 व्या षटकात साऊदीचा टिच्चून मारा
केकेआरला 19 वे षटक महागडे पडल्यानंतर 20 षटक टाकण्यासाठी आलेल्या साऊदने टिच्चून मारा केला. त्याने 4 धावा देत एक विकेट घेतली.
160-5 : सलग तीन षटकार आणि बाद
लखनौचा स्टार हिटर मार्कस स्टॉयनिसने शिवम मावी टाकत असलेल्या 19 व्या षटकात पहिल्या तीन चेंडूवर तीन षटकार मारत धडाक्यात सुरूवात केली. मात्र मावीने स्टॉयनिसला (28) चौथ्या चेंडूवर बाद केले. परंतू त्यानंतर आलेल्या जेसन होल्डरने मावीला पुन्हा शेवटच्या दोन चेंडूवर दोन षटकार लगावात एकाच षटकात 30 धावा वसूल केल्या.
122-4 रसेलचा डबल धमाका
आंद्रे रसेलने लखनौला शतकी मजल मारून देणाऱ्या दीपक हुड्डा (41 ) आणि क्रुणाल पांड्याला (25) बाज करत लखनौला डबल धक्का दिला.
73-2 : दमदार अर्धशतक करणारा डिकॉक बाद
राहुल बाद झाल्यानंतर डाव सावरत अर्धशतक ठोकणाऱ्या क्विंटन डिकॉकला सुनिल नारायणने बाद केले. डिकॉकने 29 चेंडूत 50 धावांची खेळी केली.
2-1: लखनौला पहिल्याच षटकात मोठा धक्का
कोलकाता नाईट रायडर्सने लखनौ सुपर जायंटला पहिल्याच षटकात मोठा धक्का दिला. श्रेयस अय्यरने केएल राहुलला शुन्यावर धावबाद केले.
उमेश यादवला दुखापत केकेआरला मोठा धक्का
केकेआरचा सर्वात यशस्वी गोलंदाज उमेश यादव आजच्या महत्वाच्या सामन्यात खेळणार नाही. दुखापतीमुळे तो संघाबाहेर आहे. त्याची जागा हर्षित राणा घेणार आहे. लखनौनेही आपल्या संघात बदल केला असून आवेश खान गौतमची जागा घेणार आहे.
कोलकात्याने नाणेफेक जिंकली
कोलकाता नाईट रायडर्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
Web Title: Ipl 2022 Lucknow Super Giants Vs Kolkata Knight Riders 53rd Match Live Cricket Score Highlights
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..