IPL 2022 Lucknow Super Giants vs Mumbai Indians
IPL 2022 Lucknow Super Giants vs Mumbai Indians esakal

MI vs LSG : मुंबईच्या पराभवात लखनौने पडू दिला नाही खंड; पाहा Highlights

132-8 : क्रुणाल पांड्याचा अखेरच्या षटकात कहर 

क्रुणाल पांड्याने अखेरच्या षटकात कायरॉन पोलार्ड पाठोपाठ डॅनियल सॅम्सला देखील बाद केले.

132-7 : उनाडकट धावबाद

131-6 : क्रुणाल पांड्याने पोलार्डची देखील केली शिकार

124-5 : तिलक वर्माची 38 धावांची खेळी आली संपुष्टात

पोलार्डबरोबर पाचव्या विकेटसाठी अर्धशतकी खेळी करणारा तिलक वर्मा अखेरची दोन षटके राहिली असताना 38 धावांवर बाद झाला. त्याला जेसन होल्डरने बाद केले.

पोलार्ड - तिलक वर्माने भागीदारी रचली खरी मात्र..

मुंबईची मधली फळी ढेपाळल्यानंतर आलेल्या कायरॉन पोलार्ड आणि तिलक वर्माने डाव सावरत अर्धशतकी (57) भागीदारी रचली. मात्र खेळपट्टी स्लो होत गेल्याने त्यांना फटकेबाजी करण्यात अडचण येत होती.

67-4 : मुंबई मोठ्या अडचणीत

रोहित बाद झाल्यानंतर डाव सावरण्याची जबाबदारी सूर्यकुमार यादववर आली होती. मात्र त्याला आयुष बदोनीने अवघ्या 7 धावांवर बाद करत मोठा धक्का दिला.

58-3 : क्रुणाल पांड्याने बदला घेतला

मुंबई इंडियन्सने रिटेन न केलेल्या क्रुणाल पांड्याने मुंबई इंडियन्सला मोठा धक्का दिला. त्याने मुंबईचा कर्णधार रोहित शर्माला 39 धावावर बाद केले.

54-2 : डेवाल्ड ब्रेविसकडून निराशा 

इशान किशन बाद झाल्यानंतर आलेल्या डेविल्ड ब्रेविसला मोहसीन खानने 3 धावांवर बाद करत मुंबईला दुसरा धक्का दिला.

49-1 : अखेर कासवाच्या गतीचा इशान किशन बाद

एका बाजूने रोहित शर्मा आक्रमक खेळत असताना दुसऱ्या बाजूला इशान किशनला साध्या बॉल टू रन धावा करता आल्या नाहीत. अखेर त्याची 20 चेंडू खेळून 'तब्बल' 8 धावांची केलेली खेळी रवी बिश्नोईने संपवली.

 धMI 43/0 (6) : मुंबईची आश्वासक सुरूवात

मुंबई इंडियन्सने लखनौ सुपर जायंटने ठेवलेल्या 169 धावांचे आव्हान पार करताना चांगली सुरुवात केली. सलामी जोडी इशान किशन आणि रोहित शर्माने मुंबईला 43 धावांपर्यंत पोहचवले. यात रोहितचा 31 तर इशानच्या 6 धावांचा वाटा होता.

 LSG 168/6 (20) : केएल राहुलची एकाकी झुंज 

एका बाजूने लखनौ सुपर जायंटचे फलंदाज एका पाठोपाठ एक बाद होत असताना संघाचा कर्णधार केएल राहुलने एकाकी झुंज दिली. त्याने लखनौला 18 व्या षटकात 150 चा टप्पा पार करून दिला. त्याने हंगामातील दुसरे शतक ठोकत संघाला 168 धावांपर्यंत पोहचवले. राहुलने नाबाद 103 धावा केल्या. तर आयुष बदोनीने 11 चेंंडूत 14 धावा केल्या.

121-5 : लखनौचा निम्मा संघ माघारी

मेरेडिथने दीपक हुड्डला 10 धावांवर बाद करत लखनौला पाचवा धक्का दिला. केएल राहुल एका बाजूने लढत असताना दुसऱ्या बाजूने त्याचे शिलेदार एका पाठोपाठ एक माघारी जात आहेत.

103-4 : पोलार्डचा लखनौला अजून एक धक्का

कायरॉन पोलार्डने क्रुणाल पांड्याला अवघ्या 1 धावेवर बाद करून लखनौ सुपर जायंटला मोठा धक्का दिला. लखनौची अवस्था 1 बाद 85 धावांवरून 4 बाद 103 धावा अशी झाली आहे.

102-3 : सॅम्सने मोठा मासा लावला गळाला

डॅनियल सॅम्सने लखनौ सुपर जायंटमधील सर्वात खतरनाक खेळाडू मार्कस स्टॉयनिसला शुन्यावर बाद करून लखनौला मोठा धक्का दिला.

85-2 : लखनौला दुसरा धक्का

केएल राहुल आणि मनिष पांडे ही जमलेली जोडी मुंबईच्या कायरॉन पोलार्डने फोडली. त्याने मनिष पांडेला 22 धावांवर बाद केले.

कर्णधार राहुलचे दमदार अर्धशतक

डिकॉक बाद झाल्यानंतर राहुलने डावाची सूत्रे आपल्या हातात घेत मनिष पांडेसोबत भागीदारी रचली. दरम्यान राहुलने आपले अर्धशतकही पूर्ण केले.

27-1 : बुमराहने जुन्या सहकाऱ्याचा काटा काढला

प्रथम गोलंदाजी करणाऱ्या मुंबई इंडियन्सने लखनौ सुपर जायंटला पॉवर प्लेमध्ये पहिला धक्का दिला. जसप्रीत बुमराहने आपला जुना सहकारी क्विंटन डिकॉकला 10 धावांवर बाद केले.

लखनौ संघात एक बदल

लखनौ सुपर जायंटने आपल्या संघात एक बदल केला आहे. आवेश खान दुखापतीमुळे आजचा सामना खेळणार नाही. तर त्याच्या जागी मोहसीन खान याला संधी मिळाली आहे.

मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकली

मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

मुंबईचा सलग आठवा पराभव; पाहा हायलाईट्स

मुंबई : लखनौ सुपर जायंटने मुंबईचा 36 धावांनी पारभव करत आपला पाचवा विजय साजरा केला. लखनौने केएल राहुलच्या नाबाद 103 धावांच्या खेळीच्या जोरावर मुंबईसमोर 169 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र मुंबईला हे आव्हान पेलवले नाही. त्यांनी 20 षटकात 8 बाद 132 धावा केल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com