LSG vs RCB : लखनौचे पॅकअप, क्वालिफायर 2 मध्ये दोन रॉयल्स भिडणार

IPL 2022 Lucknow Super Giants vs Royal Challengers Bangalore Eliminator
IPL 2022 Lucknow Super Giants vs Royal Challengers Bangalore Eliminatoresakal

कोलकाता : शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात अखेर रॉयल चॅलेंजर बेंगलोरने लखनौ सुपर जायंटचा 14 धावांनी पराभव करत आयपीएलमधून त्यांचा गाशा गुंडाळला. केएल राहुलने झुंजार 79 तर दीपक हुड्डाने 45 धावा केल्या मात्र मोक्याच्या क्षणी आरसीबीच्या गोलंदाजांना आपला खेळ उंचावत सामन्यावर नियंत्रण मिळवले. आरसीबीकडून जॉस हेजलवूडने 3 विकेट घेतल्या. फलंदाजीत आरसीबीकडून रजत पाटीदारने नाबाद 112 धावांची शतकी खेळी केली. तर त्याला कार्तिकने 23 चेंडूत नाबाद 37 धावा करून चांगली साथ दिली. आता शुक्रवारी 27 मे ला अहमदाबादमध्ये राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर बेंगलोर भिडणार.

 6 चेंडूत 24 धावांची गरज

लखनौ सुपर जायंट्सला विजयासाठी 6 चेंडूत 24 धावांची गरज होती. क्रिजवर लुईस चमीरा होते. चमीराने तिसऱ्या चेंडूवर षटकार मारत सामना 3 धावात 16 धावा असा आणला.

180-6 : क्रुणाल पांड्या भोपळाही न फोडता माघारी

180-5 : केएल राहुल मोक्याच्या क्षणी बाद 

19 वे षटक टाकणाऱ्या जॉस हेजलवूडनेही षटकाच्या सुरूवातीलाच तीन वाईड टाकले. मात्र त्याने 57 चेंडूत 79 धावा करणाऱ्या केएल राहुलला बाद करत लखनौला मोठा धक्का दिला.

173-4 : मार्कस स्टॉयनिस 9 धावा करून बाद 

दीपक हुड्डाचा हसरंगाने उडवला त्रिफळा

तिसऱ्या विकेटसाठी केएल राहुल आणि दीपक हुड्डाने 61 चेंडूत 96 धावांची भागीदारी रचली. त्यांनी संघाला 130 धावांचा टप्पा पार करून दिला. मात्र हसरंगाने दीपक हुड्डाचा 45 धावांवर त्रिफळा उडवला.

केएल राहुलचे दमदार अर्धशतक

केएल राहुलने दमदार अर्धशतक ठोकत चांगली झुंज दिली.

41-2 : मनन व्होराने राहुलची साथ सोडली

मनन व्होराला जॉस हेडलवूडने 19 धावांवर बाद करत लखनौला दुसरा धक्का दिला.

8-1 : लखनौला पहिल्याच षटकात धक्का

मोहम्मद सिराजने पहिल्याच षटकात क्विंटन डिकॉकला 6 धावांवर बाद करत लखनौला पहिला धक्का दिला.

RCB 207/4 (20) :दिनेश कार्तिकची फटकेबाजी

रजत पाटीदारबरोबरच दिनेश कार्तिकने देखील 23 चेंडूत 37 धावा चोपून आरसीबीला 207 धावांपर्यंत पोहचवले. रजत पाटीदारने 54 चेंडूत 112 धावा केल्या.

अर्धशतकानंतर पाटीदार आक्रमक

रजत पाटीदारने आक्रमक फलंदाजी करत 49 चेंडूत शतक पूर्ण केले. हे त्याचे आयपीएलमधील पहिलेच शतक आहे.

115-4 : महिपाल झाला बाद 

महिपाल लोमरोरला रवी बिश्नोईने 14 धावांवर बाद करत आरसीबीला चौथा धक्का दिला.

86-3 : मॅक्सवेल 9 धावांची भर घालून माघारी

70-2 : विराट कोहली 25 धावा करून बाद

पॉवर प्लेमध्ये सावध फलंदाजी करणाऱ्या विराट कोहलीला आवेश खानने 25 धावांवर बाद करत आरसीबीला दुसरा धक्का दिला.

RCB 52/1 (6) : पाटीदारची फटकेबाजी

फाफ ड्युप्लेसिस बाद झाल्यानंतर सलामीवीर विराट कोहली आणि रजत पाटीदार यांनी पॉवर प्लेमध्ये आरसीबीला अर्धशतकी मजल मारून दिली. यात आक्रमक खेळणाऱ्या रजत पाटीदारचे 33 धावांचे योगदान होते.

4-1 : आरसीबीला पहिल्याच षटकात धक्का

रॉयल चॅलेंजर बेंगलोरचा कर्णधार फाफ ड्युप्लेसिस मोहसीन खानच्या गोलंदाजीवर पहिल्याच चेंडूवर भोपळाही न फोडता बाद झाला.

अखेर नाणेफेक झाली.

पावसाचा व्यत्यय थांबल्यानंतर नाणेफेक झाली. लखनौ सुपर जायंटने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

सामन्यापूर्वीच पावसाचा व्यत्यय

एलिमनेटर सामन्यासाठी दोन्ही संघ तयार होत असतानाच पावसाने व्यत्यय आणल्यामुळे नाणेफेकीस उशीर होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com