डग आउटमध्ये पहिल्यांदाच सचिनसोबत दिसला अर्जुन; फोटो व्हायरल

IPL 2022 MIvsLSG
IPL 2022 MIvsLSG Sakal News

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन (Arjun Tendulkar) याच्या आयपीएलमधील एन्ट्रीसाठी एक माहोल तयार होण्यास सुरुवात झालीये. आधी मुंबई इंडिेयन्सचे (Mumbai Indians) सूचक ट्विट केले. त्यानंतर मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जाएंट्स यांच्यातील सामन्यादरम्यान एक खास सीन पाहायला मिळाला. डग आउटमध्ये सचिन तेंडुलकर आणि अर्जुन तेंडुलकर शेजाशेजारी बसल्याचे पाहायला मिळाले. आयपीएलमध्ये अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघाला जॉईन झाल्यापासून याआधी कधीच बाप-बेटा कधीच डग आउटमध्ये एकत्र बसल्याचे दिसले नव्हते. लखनौ विरुद्धच्या सामन्यात पहिल्यांदाच हा सीन पाहायला मिळाला. सोशल मीडियावर हा फोटो चांगलाच व्हायरल होताना दिसतोय.

IPL 2022 MIvsLSG
MI ची चाहत्यांना गूगली! Arjun Tendulkar बाकावरच!

सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) 2019 च्या हंगामात पहिल्यांदाच अर्जुन तेंडुलकरने आयपीएलच्या मिनी लिलावात नाव नोंदवले होते. यावेळी लिलावाच्या सर्वात शेवटी अर्जुन तेंडुलकरच्या नावाची घोषणा झाली होती. यावेळी मुंबई इंडियन्सने मूळ किंमतीसह अर्जुन तेंडुलकरला आपल्या ताफ्यात सामील करुन घेतलं होत.

यंदाच्या मेगा लिलावात 21 वर्षीय अर्जुन तेंडुलकरवर गुजरात टायटन्सने बोली लावली होती. 20 लाख मूळ किंमत असलेल्या अर्जुनसाठी त्यांनी 25 लाख रुपये देण्याची तयारी दर्शवली होती. मुंबई इंडियन्सने 30 लाख मोजून पुन्हा अर्जुन तेंडुलकरला आपल्या ताफ्यात घेतलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com