IPL 2022 : सिराजच्या अंगात शिरला रोनाल्डो; व्हिडिओ व्हायरल |Mohammed Siraj Viral Video| IPL 2022 | RCB | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mohammed Siraj

IPL 2022 : सिराजच्या अंगात शिरला रोनाल्डो; व्हिडिओ व्हायरल

आयपीएल स्पर्धेतील दुसऱ्या दिवशी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्ज (RCB vs PBKS) यांच्यातील सामन्यात धावांची बरसात झाल्याचे पाहायला मिळाले. पहिल्यांदा बॅटिंग करताना 200 पेक्षा अधिक धावा करुन रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाला (Royal Challengers Bangalore ) पराभवाचा सामना करावा लागला. पहिल्यांदा फलंदाजी करताना आरसीबीने 2 बाद 205 धावा केल्या होत्या.. पंजाबने एक षटक राखून हे आव्हान परतवून लावले. या सामन्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा गोलंदाज मोहम्‍मद सिराज (Mohammed Siraj) याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. काही नेटकरी त्याला ट्रोल करत असून त्याने विकेट मिळाल्यानंतर आनंद व्यक्त करताना केलेल्या सेलिब्रेशनचीही जोरदार चर्चा रंगली आहे.

हेही वाचा: IPL 2022: हार्दिकला मिळाला अफगाणी डेप्युटी; GTने निवडला उपकर्णधार

हैदराबादकर सिराजने 14 व्या षटकात 2 चेंडूत 2 विकेट घेतल्या. या विकेट्स घेतल्यानंतर सिराजने लोकप्रिय फुटबॉलपटू रोनाल्‍डोच्या (Cristiano Ronaldo )स्टाइलमध्ये सेलिब्रेश केले. सिराजने पहिल्यांदा दमदार फलंदाजी करत असलेल्या भानुका राजपक्षेला आपले शिकार केले. त्यानंतर त्याने अंडर 19 वर्ल्‍ड कप स्‍टार राज बावाला तंबूचा रस्ता दाखवला. या दोन विकेट्स रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या ताफ्यात उत्साह निर्माण करणाऱ्या होत्या. पण अखेर पंजाबने त्यांच्यासमोर विजयी भांगडा केल्याचे पाहायला मिळाले.

हेही वाचा: PBKS vs RCB : आरसीबीचे येरे माझ्या मागल्या; मयांकच्या नेतृत्वात पंजाबचे बल्ले बल्ले

पंजाबकडून शिखर धवन आणि भानुका यांनी प्रत्येकी 43- 43 धावा करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. ओडिन स्मिथने 8 चेंडूत नाबाद 25 धावा करत पंजाबच्या संघाला 19 व्या षटकातच विजय मिळवून दिला. आरसीबीकडून कर्णधार फाफ डु प्‍लेसीसने (Faf du Plessis )सर्वाधिक 88 धावांची खेली केली होती. त्याच्याशिवाय विराट कोहलीने नाबाद 41 धावा केल्या होत्या. दिनेश कार्तिकने 14 चेंडूत नाबाद 32 धावांची खेळी केली.

Web Title: Ipl 2022 Mohammed Siraj Turns Cristiano Ronaldo Against Punjab Kings Celebration Video Goes Viral Watch

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..