एमसीएने थकवले 14.82 कोटी तरी मुंबई पोलिसांची IPL ला कडक सुरक्षा

IPL MCA Mumbai police
IPL MCA Mumbai policeESAKAL

मुंबई: आयपीएलचा 15 वा हंगाम (IPL 2022) यंदा महाराष्ट्रात खेळवला जाणार आहे. लीगमधील तब्ब्ल 70 सामने मुंबई, नवी मुंबई आणि पुण्यात होणार आहेत. मुंबईतील आयपीएल सामन्यासाठी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) कडोकोट सुरक्षा दिली आहे. खेळाडूंच्या हॉटेलपासून ते प्रॅक्टिस आणि सामना होणाऱ्या मैदानापर्यंतचा संपूर्ण मार्ग पोलिसांनी सुरक्षित (Security) केला आहे.

मात्र आयपीएलवर कोणतेही संकट येऊ नये म्हणून दिवस रात्र राबणाऱ्या मुंबई पोलिसांचेच जवळपास 14.82 कोटी रूपये मुंबई क्रिकेट असोसिएशनने थकवल्याचे उघड झाले आहे. मुंबई पोलिसांनी ही रक्कम वसूल करण्यासाठी एमसीएला तब्बल 35 स्मरण पत्रे दिली आहेत. मात्र एमसीएकडून अजून पैसे देण्याची काही चिन्हे दिसत नाहीत. अशा परिस्थितीतही मुंबई पोलिसांनी आपल्या कर्तव्यात कोणतीच कसूर ठेवलेली नाही.

IPL MCA Mumbai police
VIDEO: मराठमोळ्या अजिंक्य रहाणेचे अस्खलित बंगाली ऐकले का?

मुंबई पोलिसांनी गेल्या 8 वर्षातील विविध क्रिकेट सामन्यांत सुरक्षा परवली होती. त्याबाबतच्या शुल्काची माहिती मुंबई पोलिसांनी दिली. 2013 मध्ये संपन्न झालेला महिला क्रिकेट विश्वचषक, 2016 चा टी -20 विश्वचषक, 2016 मधील कसोटी सामने, 2017 आणि 2018 मध्ये खेळले गेलेली आयपीएल आणि एकदिवसीय सामन्यांचे 14 कोटी 82 लाख 74 हजार 177 रुपये मुंबई क्रिकेट असोसिएशनने (Mumbai Cricket Association) अद्याप भरलेले नाहीत. मुंबई क्रिकेट असोसिएशनने गेल्या 8 वर्षात फक्त 2018 च्या आयपीएल क्रिकेट सामन्यासाठी आकारलेले 1.40 कोटीचे शुल्क प्रामाणिकपणे अदा केले आहे. मुंबई पोलिसांनी दावा केला आहे की आतापर्यंत मुंबई पोलिसांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षांना 35 स्मरणपत्रे पाठवली आहेत. तर या थकबाकी रक्कमेवर 9.5 टक्के व्याज आकारले जाणार आहे.

IPL MCA Mumbai police
CSK vs KKR: केकेआरचे 'वानखेडे'शी वाकडे; त्यात पहिलाच सीएसकेचा अवघ पेपर

याचबरोबर मुंबई पोलिसांनी 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2020 या कालावधीत क्रिकेट सामन्यांसाठी पुरवण्यात आलेल्या सुरक्षेचे शुल्क आकारण्यात आलेले नाही. कारण राज्य सरकारने या सामन्यांसाठी शुल्क आकारले जावे की नाही याबाबत अजून कोणताही आदेश दिलेला नाही. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी गृह विभागाच्या मुख्य सचिवांना 9 वेळा पत्रव्यवहार केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com