CSK vs KKR: केकेआरचे 'वानखेडे'शी वाकडे; त्यात पहिलाच सीएसकेचा अवघ पेपर

IPL 2022 Chennai Super Kings Kolkata Knight Riders
IPL 2022 Chennai Super Kings Kolkata Knight Ridersesakal

मुंबई: आयपीएल 2022 (IPL 2022) चा पहिल्या सामना आज ( दि. 26 मार्च) गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यात होत आहे. हा सामना वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) होणार आहे. सीएसकेने गेल्या हंगामात आपली चौथी आयपीएल ट्रॉफी जिंकली होती. तर केकेआरने आतापर्यंत दोन वेळा आयपीएल ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे. आजचा सामना सायंकाळी 7.30 मिनिटांनी होणार आहे.

IPL 2022 Chennai Super Kings Kolkata Knight Riders
कॅप्टन संजूचा तो फोटो शेअर करणं आलं अंगलट; RRची सोशल टीम हटवली

आयपीएलच्या 15 व्या हंगामात सलामीलाच भिडणाऱ्या सीएसके आणि केकेआर यांचे एकमेकांविरूद्धचे आतापर्यंतचे रेकॉर्ड पाहिले तर या दोन्ही संघात 26 आयपीएल सामने झाले आहेत. त्यातील तब्बल 17 सामन्यात सीएसकेने विजय मिळवला असून केकेआरला फक्त 8 सामन्यातच विजय मिळवता आला आहे. एक सामना अनिर्णित राहिला होता. ही आकडेवारी पाहिली तर सीएसकेचा पेपर कायम केकेआरसाठी अवघड गेल्याचे दिसते.

IPL 2022 Chennai Super Kings Kolkata Knight Riders
IPL 2022 : सलामीची लढत कोण जिंकणार?

गेल्या हंगामात या दोन संघात तीन सामने खेळले गेले होते. त्यातील एख सामना वानखेडे स्डेडियमवर झाला होता. मात्र या सामन्यात सीएसकेने केकेआरच्या गोलंदाजांची यथेच्छ धुलाई करत 220 धावा टोकल्या होत्या. केकेआरने देखील त्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांची गाडी 202 धावांच्या पुढे जाऊ शकली नाही.

या दोन्ही संघातील गेल्या 5 सामन्याची आकडेवारी पाहिली तर केकेआर तिथेही मागे पडले असल्याचे दिसते. केकेआरला गेल्या 5 सामन्यापैकी फक्त 1 सामनाच जिंकता आला आहे. मात्र यंदाच्या हंगामात केकेआरचा नवा संघ सीएसकेसमोर नव्याने आव्हान उभे करण्याचा प्रयत्न करेल. वानखेडेवर केकेआरचे ट्रॅक रेकॉर्ड पाहता, केकेआरने वानखेडेवर आतापर्यंत 11 सामने खेळले आहेत. मात्र त्यातील एकाच सामन्यात त्यांना विजयाची चव चाखता आली होती. तर दुसरीकडे सीएसकेला वानखेडेवर 19 पैकी तब्बल 11 वेळा विजयी आशीर्वाद मिळाला आहे.

IPL 2022 Chennai Super Kings Kolkata Knight Riders
जडेजा कॅप्टन्सीसाठी सीएसके सोडण्याची होती शक्यता : आकाश चोप्रा

विशेष म्हणजे आजच्या चेन्नई आणि कोलकाता सामन्यात दोन्ही संघ आपल्या नव्या नेतृत्वाखाली मैदानात उतरणार आहेत. महेंद्रसिंह धोनीने दोन दिवसांपूर्वीच कर्णधारपद रविंद्र जडेजाकडे (Ravindra Jadeja) सोपवले होते. तर केकेआरने मुंबईकर श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) आपला नेता म्हणून घोषित केले आहे. श्रेयस अय्यर हा यंदाच्या हंगामातील रोहित शर्मानंतरचा सर्वात अनुभवी कर्णधार आहे. त्याने 2018 ते 2020 पर्यंत दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व केले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com