MI vs KKR : केकेआरचा मुंबईवर दणदणीत विजय

IPL 2022 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders
IPL 2022 Mumbai Indians vs Kolkata Knight Ridersesakal

मुंबई : कोलकाता नाईट रायडर्सने मुंबईचा 52 धावांनी पराभव करत आपला पाचवा सामना जिंकला. केकेआरचे 165 धावांचे आव्हान पार करताना मुंबईचा संघ 113 धावात पॅव्हेलियनमध्ये परतला. केकेआरकडून पॅट कमिन्सने 3 तर आंद्रे रसेलने 2 विकेट घेत मुंबईच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. सलामीवीर इशान किशनने झुंजार खेळी करत 51 धावा केल्या. मात्र मुंबईच्या इतर फलंदाजांना विकेटवर तग धरता आला नाही. (Kolkata Knight Riders Defeat Mumbai Indians Reached on 7th Spot In Point Table)

पाहा हायलाईट्स

113-10 : मुंबईचे शेपूट धावण्यात कच्चे

मुंबई इंडियन्सचे पोलार्ड, कार्तिकेय आणि जसप्रीत बुमराह पाठोपाठ धावबाद झाले. त्यामुळे केकेआरने मुंबईचा डाव 113 धावात संपवत 52 धावांनी दणदणीत विजय मिळवला.

112-8 : कुमार कार्तिकेय 3 धावांवर धावबाद

102-7 : पॅट कमिन्सचे मुंबईला धक्क्यावर धक्के

15 वे षटक टाकणाऱ्या पॅट कमिन्सने मुंबईला एकाच षटकात तीन धक्के दिले. त्याने पहिल्या चेंडूवर इशान किशन, चौथ्या चेंडूवर डॅनियल सॅम्स आणि सहाव्या चेंडूवर मुर्गन अश्विनला बाद करत मुंबईची अवस्था 7 बाद 102 धावा अशी केली.

100-5 : मुंबई इंडियन्सला मोठा धक्का

पॅट कमिन्सने मुंबईला मोठा धक्का दिला. त्याने झुंजार खेळी करणाऱ्या इशान किशनला 51 धावांवर बाद केले.

इशान किशनचे झुंजार अर्धशतक 

मुंबईचे एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत असताना सलामीवीर इशान किशनने झुंजार अर्धशतकी खेळी केली.

83-4 : टीम डेव्हिड 13 धावा करून बाद 

69-3 : रसेलने मुंबईला दिला तिसरा धक्का

आंद्रे रसेलने सूर्यकुमार यादवच्या जागी संधी मिळालेल्या रमनदीप सिंहला 12 धावांवर बाद करत मुंबईला तिसरा धक्का दिला.

32-2 मुंबईला दोन धक्के

केकेआरचे 165 धावांचे आव्हान पार करण्यासाठी मैदानात उतरलेल्या मुंबईला पॉवर प्लेमध्ये दोन धक्के बसले. टीम साऊदीने रोहित शर्माला 2 धावांवर तर आंद्रे रसेलने तिलक वर्माला 6 धावांवर बाद केले.

रिंकू सिंगच्या नाबाद 23 धावा; केकेआरच्या 20 षटकात 9 बाद 165 धावा 

156-8 जसप्रीत बुमराहने एकाच षटकात केला कहर 

पंधराव्या षटकात दोन विकेट घेणाऱ्या जसप्रीत बुमराहने 17 व्या षटकात तिहेरी दणका दिला. त्याने पहिल्या चेंडूवर शेल्डन जॅक्सन, तिसऱ्या चेंडूवर पॅट कमिन्स आणि चौथ्या चेंडूवर सुनिल नारायणला बाद करत आपल्या पाच विकेट पूर्ण केल्या.

139-5 : बुमराहचा डबल धमाका रसेल पाठोपाठ राणाचीही केली शिकार

जसप्रीत बुमराहने 15 व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर आंद्रे रसेलला 9 धावांवर बाद करत केकेआरला चौथा धक्का दिला. त्यानंतर याच षटकाच्या चौथ्या चेंडूवर 43 धावा करून झुंज देणाऱ्या नितीश राणाला देखील बाद केले.

123-3 : श्रेयस अय्यरकडून पुन्हा निराशा

केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यरने पुन्हा एकदा निराशा केली. मुर्गन अश्विनने त्याला अवघ्या 6 धावांवर बाद केले.

87-2 : कार्तिकेयनने दिला दुसरा धक्का

कुमार कार्तिकेयने सलामीवीर अजिंक्य रहाणेला 25 धावांवर बाद करत केकेआरला दुसरा धक्का दिला.

व्यंकटेश अय्यरचे अर्धशतक हुकले. 

सलामीला आलेल्या व्यंकटेश अय्यरने पॉवर प्लेमध्ये आक्रमक फलंदाजी करत केकेआरला बिनबाद 60 धावांपर्यंत पोहचवले होते. यात त्याच्या 23 चेंडूत केलेल्या 43 धावांचे मोठे योगदान होते. मात्र कुमार कार्तिकेयने त्याला बाद करत केकेआरला पहिला धक्का दिला.

केकेआरने जवळपास निम्मा संघ बदलला

कोलकाता नाईट रायडर्सने आपल्या संघात मोठे बदल केले आहेत. अजिंक्य रहाणे, पॅट कमिन्स, व्यंकटेश अय्यर, वरूण चक्रवर्ती आणि शेल्डन जॅक्सन यांना पुन्हा स्थान देण्यात आले आहे. तर मुंबईत्या संघात एक बदल करण्यात आला आहे. जखमी सूर्यकुमार यादवच्या जागी रमनदीप सिंगला संधी मिळाली आहे.

मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकली

मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com