MI vs PBKS
MI vs PBKSSakal

VIDEO : ... अन् VIP गॅलरीत निता अंबानींचा आनंद गगनात मावेना!

पुणे : पंजाब विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांना पहिले यश मिळवण्यासाठी 57 चेंडूची प्रतिक्षा करावी लागली. पहिल्या विजयाच्या शोधात असलेल्या मुंबई इडियन्सने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पंजाबकडून कर्णधार मयंक अग्रवाल आणि शिखर धवन जोडीनं संघाला दमदार सुरुवात करुन दिली. ही जोडी शतकी भागीदारीकडे वाटचाल करत असताना दहाव्या षटकात थम्पीनं मुंबई इंडियन्सला दिलासा दिला. त्याने कर्णधार मयंक अग्रवालला बाद केले.

मुंबई इंडियन्सला पहिली विकेट मिळाल्यानंतर संघाच्या मालकीण निता अंबानी यांच्या चेहऱ्यावरही थोडं हसू फुलल्याचे पाहायला मिळाले. मुंबईला पहिली विकेट मिळताच कॅमेरा VIP गॅलरीकडे वळला. यावेळी निता अंबानींसह त्यांचा मुलगा अकाश अंबानी टाळ्या वाजवून संघाच्या आनंदात सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. हा सिलसिला इथेच थांबला नाही. जयदेव उनादकटनं बेयरस्टोला बोल्ड केल्यावरही हाच नजारा पाहायला मिळाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com