IPL 2022 : पॅट कमिन्सच्या तुफान खेळीचा रेकाॅर्ड; मुंबई इंडियन्सची उडवली दाणादाण | Pat Cummins Record | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IPL 2022  | Pat Cummins Record

IPL 2022 : पॅट कमिन्सच्या तुफान खेळीचा रेकाॅर्ड; मुंबई इंडियन्सची उडवली दाणादाण

IPL 2022 : इंडियन प्रीमियर लीगमध्ये बुधवारी झालेल्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने (केकेआर) एक हाती विजय मिळवला. कोलकाता नाईट रायडर्सच्या पॅट कमिन्सने अवघ्या 14 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. ज्यामध्ये त्याने एका षटकात 35 धावा करून कोलकाताला एक मोठा विजय मिळवून दिला. कमिन्सने आयपीएल इतिहासातील सर्वात जलद अर्धशतक करण्याच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. यापूर्वी केएल राहुलच्या नावावर विक्रम होता.(IPL 2022 Pat Cummins Record)

हेही वाचा: IPL 2022 : आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंच्या आगमनाने चुरस वाढणार

पॅट कमिन्सने मुंबई इंडियन्सविरुद्धच्या खेळीत केवळ 15 चेंडू खेळले आणि 54 धावा केल्या. आपल्या धडाकेबाज खेळीत त्याने 6 षटकार आणि 4 चौकार झोडले आहेत. सामना एका निर्णायक टप्प्यावर आला होता, पण पॅट कमिन्सने जोरदार फटकेबाजी करत संपूर्ण सामनाच केकेआरच्या बाजूने ओढून आणला‌.

आयपीएलच्या इतिहासातील सर्वात वेगवान अर्धशतकांचा विक्रम पाहिला तर आता केएल राहुल आणि पॅट कमिन्स यांच्या नावावर संयुक्तपणे हा विक्रम आहे. तर पहिल्या पाचमध्ये तीन भारतीयांच्या नावावर हा विक्रम आहे. विशेष म्हणजे केकेआरकडून खेळताना तीन खेळाडूंनी हा विक्रम केला आहे.

हेही वाचा: IPL 2022: मुंबईचा 'सूर्य' तळपला मात्र कमिन्सने विजयी मनसुब्यांचा 'कचरा' केला

आयपीएलच्या इतिहासातील सर्वात वेगवान अर्धशतकांचा विक्रम

  • केएल राहुल - 14 चेंडू - किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स - 8 एप्रिल 2018

  • पॅट कमिन्स - 14 चेंडू - कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स - ६ एप्रिल २०२२

  • युसूफ पठान - 15 चेंडू - कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स - 24 मे 2014

  • सुनील नरेन - 15 चेंडू - कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स - 7 मे 2017

  • सुरेश रैना- 16 चेंडू - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब - 30 मे 2014

Web Title: Ipl 2022 Pat Cummins Record 14 Balls Fastest Fifty Ipl Kkr Vs Mi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top