IPL 2022 Point Table Rajasthan Royals Defeat Lucknow Super Giants
IPL 2022 Point Table Rajasthan Royals Defeat Lucknow Super Giantsesakal

LSG vs RR : रॉयल्स लखनौच्या नवाबांना खाली खेचत दुसऱ्या स्थानी विराजमान

मुंबई : राजस्थान रॉयल्सने लखनौ सुपर जायंटचा 24 धावांनी पराभव करत 16 गुणांची कमाई केली. राजस्थानने लखनौसमोर 179 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र लखनौला 20 षटकात 8 बाद 154 धावांपर्यंतच मजल मारली. राजस्थानकडून प्रसिद्ध कृष्णा, मॅकॉय आणि ट्रेंट बोल्ट यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. फलंदाजीत लखनौकडून दीपक हुड्डाने झुंजार खेळी करत 59 धावा केल्या. तर राजस्थानकडून यशस्वी जैसवालने 41 तर देवदत्त पडिक्कल 39 धावा केल्या. (IPL 2022 Point Table Rajasthan Royals Defeat Lucknow Super Giants Reached 2nd Spot)

IPL 2022 Point Table Rajasthan Royals Defeat Lucknow Super Giants
मुंबईच्या मलिंगाची झलक सीएसकेच्या मथीशात; VIDEO होतोय तुफान व्हायरल

राजस्थान रॉयल्सचे 179 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या लखनौ सुपर जायंटची सुरूवात खराब झाली. ट्रेंट बोल्टने तिसऱ्या षटकात क्विंटन डिकॉक (7) आणि आयुष बदोनीला (0) पाठोपाठच्या चेंडूवर बाद करत लखनौला दोन धक्के दिले.

त्यानंतर प्रसिद्ध कृष्णाने केएल राहुलला 10 धावांवर बाद करत लखनौची अवस्था 3 बाद 29 अशी केली. यानंतर आलेल्या दीपक हुड्डा आणि क्रुणाल पांड्या यांनी चौथ्या विकेटसाठी अर्शतकी भागीदारी रचली. दीपक हु़ड्डा आक्रमक फलंदाजी करत होता. तर क्रुणाल त्याला सावध खेळत साथ देत होता.

मात्र आर. अश्विनने ही जोडी फोडली. त्याने क्रुणाल पांड्याला 25 धावांवर बाद केले. त्यानंतर दीपक हुड्डाने आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र युझवेंद्र चहलने 39 चेंडूत 59 धावा करणाऱ्या दीपक हुड्डाला बाद करत लखनौला पाचवा आणि मोठा धक्का दिला. त्यानंतर मॅकॉयने देखील होल्डरला 1 धावेवर पॅव्हिलयनचा रस्ता धरायला लावला. त्यानंतर त्याच षटकात दुष्मंथा चमीराला शुन्यावर बाद करत लखनौच्या अडचणीत वाढ केली. मार्कस स्टॉयनिस 17 चेंडूत 27 धावा करून बाद झाला. अखेर लखनौचा डाव 20 षटकात 154 धावांपर्यंतच मजल मारता आली.

IPL 2022 Point Table Rajasthan Royals Defeat Lucknow Super Giants
Blog : अँड्र्यू सायमंड्स म्हणजे जिथं कमी तिथं आम्ही!

आयपीएलच्या 63 व्या सामन्यात आज प्रथम फलंदाजी करणाऱ्या राजस्थान रॉयल्सला लखनौ सुपर जायंटने पॉवर प्लेमध्येच मोठा धक्का दिला. आवेश शानने फॉर्ममध्ये असलेल्या जॉस बटलरचा अवघ्या दोन धावांवर त्रिफळा उडवून दिला. मात्र त्यानंतर सलामीवीर यशस्वी जैसवाल आणि संजू सॅमसन यांनी अर्धशतकी भागीदारी रचत संघाला पंचाहत्तरी पार करून दिली.

मात्र होल्डरने ही जोडी फोडली. त्याने संजू सॅमसनला 32 धावांवर बाद कले. त्यानंतर आयुष बदोनीने राजस्थानला तिसरा धक्का दिला. अर्धशतकाच्या जवळ पोहचलेल्या यशस्वी जैसवालला 41 धावांवर बाद केले. त्यानंतर पडिक्कलने आक्रमक फलंदाजी करत संघाला शतक पार करून दिले. मात्र त्याला मोठी खेळी करण्यात अपयश आले. रवी बिश्नोईने त्याला 39 धावांवर बाद केले.

दरम्यान, रियान पराग 19 आणि जेम्स निशम 14 धावांची भर घालून बाद झाले. त्यानंतर रवीचंद्रन अश्विन (10) आणि ट्रेंट बोल्ट (17) यांनी आक्रमक फलंदाजी करत संघाला 178 धावांपर्यंत पोहचवले. लखनौकडून रवी बिश्नोईने सर्वाधिक 2 बळी टिपले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com