CSK vs PBKS : ऋषी धवनचे शेवटचे षटक ठरले ट्रम्पकार्ड

IPL 2022 Punjab Kings vs Chennai Super Kings
IPL 2022 Punjab Kings vs Chennai Super Kingsesakal

शेवटच्या षटकात सीएसकेला हव्या होत्या 27 धावा आणि... 

शेवटच्या षटकात सीएसकेला विजयासाठी 27 धावांची गरज असताना ऋषी धवनने महेंद्रसिंह धोनीला बाद करत चेन्नईपासून विजय दूर नेला. अखेर चेन्नईने सामना 11 धावांनी गमावला.

रबाडाने रायुडूचा उडवला त्रिफळा

रबाडाने 39 चेंडूत 78 धावा करणाऱ्या अंबाती रायुडूचा त्रिफळा उडवत पुनरागमन केले.

अंबाती रायुडूचे झुंजार अर्धशतक

सीएसकेच्या टॉप ऑर्डर मधील फलंदाज ठराविक अंतराने बाद होत असताना अंबाती रायुडूने झुंजार खेळी करत अर्धशतक ठोकले. त्याच्या या अर्धशतकाच्या जोरावरच सीएसकेने 15 व्या षटकात शंभरी पार केली.

89-4 : रबाडाने जमलेली जोडी फोडली

पंजाब किंग्जच्या कसिगो रबाडाने ऋतुराज गायकवाड आणि अंबाती रायुडूची जोडी फोडली. त्याने 27 चेंडूत 30 धावा करणाऱ्या ऋतुराजला बाद केले.

40-3 : ऋषी धवनने शिवम दुबेचा उडवला त्रिफळा

सीएसकेचा आक्रमक फलंदाज शिवम दुबेचा ऋषी धवनने 8 धावांवर त्रिफळा उडवला.

30-2 : अर्शदीपने सँटनरचा उडवला त्रिफळा

मिचेल सँटनरचा त्रिफळा उडवत अर्शदीपने सीएसकेला दुसरा धक्का दिला. सँटनरने फक्त 9 धावांचे योगदान दिले.

10-1 :चेन्नईचा पहिला फलंदाज पॅव्हेलियनमध्ये 

संदीप शर्माने चेन्नईचा अनुभवी सलामीवीर रॉबिन उथप्पाला अवघ्या 1 धावेवर बाद केले.

187-4 (20 Ov) : शिखर धवन नाबाद 

शिखर धवनने केलेल्या 59 चेंडूत नाबाद 88 धावांच्या जोरावर पंजाब किंग्जने 20 षटकात 4 बाद 187 धावा केल्या. त्याला राजपक्षेने 42 तर लिव्हिंगस्टोनने आक्रमक 19 धावा करून चांगली साथ दिली.

174-3 : फटकेबाजी करणारा लिव्हिंगस्टोन झाला बाद 

7 चेंडूत 19 धावा करणारा लिम लिव्हिंगस्टोनला ब्राव्होने बाद केले.

147-2 : अखेर ब्राव्होने फोडली जोडी

दुसऱ्या विकेटसाठी 71 चेंडूत 110 धावांची भागीदारी रचणाऱ्या शिखर धवन आणि भानुका राजपक्षे यांची जोडी अखेर ब्राव्होने फोडली. त्याने राजपक्षेला 42 धावांवर बाद केले.

शिखर धवनची दमदार खेळी 

मयांक बाद झाल्यानंतर शिखर धवनने राजपक्षेच्या साथीने दुसऱ्या विकेटसाठी शतकी (110) भागीदारी रचली. दरम्यान, शिखर धवनने आपले अर्धशतक देखील पूर्ण केले.

37-1 : तीक्षाणाने दिला पंजाबला पहिला धक्का

तीक्षाणाने पंजाब किंग्जचा कर्णधार मयांक अग्रवालला 18 धावांवर बाद करत पंजाबला पहिला धक्का दिला.

शिखर धवनच्या आयपीएलमधील 6000 धावा तर टी 20 मधील 9000 धावा पूर्ण 

200 व्या सामन्यात आपल्या सहा हजार धावा पूर्ण केल्या. त्यानंतर त्याने टी 20 क्रिकेटमधील आपला 9000 धावा देखील पूर्ण केल्या.

चेन्नईची सेम टीम तर पंजाबचे तीन बदल 

चेन्नई सुपर किंग्जने आपल्या संघात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. तर पंजाब किंग्जने आपल्या संघात तीन बदल केले आहेत. शाहरूख खान, वैभव अरोरा आणि नॅथन अॅलिस यांनी वगळण्यात आले असून त्यांच्या जागी संदीप शर्मा, ऋषी धवन आणि भानुका राजपक्षा यांचा संघात समावेश करण्यात आला आहे.

चेन्नईने नाणेफेक जिंकली

चेन्नई सुपर किंग्जने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

धोनी बाद झाला अन् सीएसकेचा पराभव निश्चित झाला.Highlights 

मुंबई : अखेरच्या षटकात ऋषी धवनने धोनला बाद केले आणि पंजाब किंग्जने चेन्नई सुपर किंग्जचा 11 धावांनी पारभव केला. पंजाबने ठेवलेल्या 188 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सीएसकेला 20 षटकात 6 बाद 176 धावाच करता आल्या. सीएसकेकडून अंबाती रायुडूने 78 धावांची झुंजार खेळी केली. मात्र त्याला सीएसकेला विजय मिळवून देता आला नाही. पंजाबकडून शिखर धवनने नाबाद 88 धावांची खेळी केली. तर ऋषी धवन आणि कसिगो रबाडाने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com