MI vs RR : बटलरचा धमाका; ठोकली हंगामातील पहिली सेंच्युरी

Jos Buttler Record century
Jos Buttler Record centurySakal

आयपीएल स्पर्धेतील नवव्या सामन्यात यंदाच्या हंगामातील पहिले शतक पाहायला मिळाले. राजस्थानचा सलामीवीर जोस बटलरने आक्रमक फटकेबाजी करत मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. एका बाजूनं विकेट पडत असताना बटलरने आपल्या शैलीत दुसरी बाजू सांभाळून नेली. 32 चेंडूत अर्धशतक झळकवल्यानंतर पुढच्या 34 चेंडूत आणखी 50 धावा करत त्याने शतकाला गवसणी घातली. यंदाच्या हंगामातील हे पहिले शतक आहे. आयपीएलमध्ये बटलरने दुसरी सेंच्युरी झळकावली आहे. IPL 2022 Rajasthan Royals Jos Buttler Record century against Mumbai Indians

Jos Buttler Record century
VIDEO : पोलार्डची तगडी प्रॅक्टीस; MI बसच्या फुटल्या काचा |MI vs RR

आयपीएलमध्ये दोन शतके झळकवाणारा तो दुसरा फलंदाज आहे. बेन स्टेक्सने 2017 आणि 2020 च्या हंगामात शतकी खेळी केली होती. बटलरने गत हंगामात हैदराबादविरुद्धच्या सामन्यात 124 धावांची खेळी केली होती. त्यानंतर आता त्याने 68 चेंडूत 11 चौकार आणि 5 षटकाराच्या मदतीने 100 धावांची खेळी केली. बुमराहने त्याला बोल्ड केलं. केविन पीटरसन हा आयपीएलमध्ये शतकी खेळी करणारा इंग्लंडचा पहिला क्रिकेटर आहे. 2012 मध्ये त्याने 103 धावांची नाबाद खेळी केली होती. 2019 च्या हंगामात जॉनी बेयरस्ट्रोनं आरसीबीविरुद्ध 114 धावांची खेळी केली होती.

Jos Buttler Record century
VIDEO : स्वत:चा संघर्ष पाहून रडला प्रविण; श्रेयसनं मारली मिठी

याआधी त्याने आयपीएलमध्ये खास विक्रमाला गवसणी घातली होती. यंदाच्या हंगामातच त्याने 2000 धावांचा टप्पा पार केला आहे. अशी कामगिरी करणारा इंग्लंडचा तो पहिला खेळाडूही ठरलाय. आतापर्यंत अन्य कोणत्याही इंग्लिश प्लेयरला अशी मजल मारता आलेली नाही. 66 सामन्यातील 65 डावात त्याने 35.75 च्या सरासरीनं आणि 149.62 च्या स्ट्राइक रेटनं 2003 धावा केल्या आहेत. राजस्थान रॉयल्सकडून खेळणारा बटलर मुंबई इंडियन्सकडूनही खेळला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com