RCB vs PBKS : पंजाबचा आरसीबीवर दणदणीत विजय

IPL 2022 Royal Challengers Bangalore vs Punjab Kings
IPL 2022 Royal Challengers Bangalore vs Punjab KingsESAKAL

RCB vs PBKS : पंजाबचा आरसीबीवर दणदणीत विजय

मुंबई : पंजाब किंग्जने राजस्थान रॉयल्सचा 54 धावांनी पराभव करत गुणतालिकेत आठव्या स्थानावरून सहाव्या स्थानावर झेप घेतली. पंजाबने ठेवलेल्या 210 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आरसीबीला 20 षटकात 9 बाद 155 धावांपर्यंतच मजल मारता आली. पंजाबकडून कसिगो रबाडाने 3 तर राहुल चहर आणि ऋषी धवन यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. आरसीबीकडून ग्लेन मॅक्सवेलने सर्वाधिक 35 धावा केल्या. तर पंजाबकडून फलंदाजी लिम लिव्हिंगस्टोनने 70 तर जॉनी बेअरस्टोने 66 धावांची दमदार खेळी केली.

Highlights

 137-8 : हसरंगा 1 धावेची भर घालून परतला

124-7 : शाहबाज अहमदची रबाडाने केली शिकार

120-6 : आरसीबीची आशा कार्तिक देखील बाद

अर्शदीप सिंगने दिनेश कार्तिकला 11 धावांवर बाद करत सहावा धक्का दिला.

104-5 : हरप्रीत ब्रारने दिला मोठा धक्का

22 चेंडूत 35 धावांची खेळी करणाऱ्या ग्लेन मॅक्सवेलने आरसीबीला 10 षटकात शतकी मजल मारून दिली. मात्र हरप्रीत ब्रारने त्याला 35 धावांवर बाद करत आरसीबीला मोठा धक्का दिला.

104-4 : राहुल चहरने फोडली जोडी

आरसीबीने 40 धावांवर 3 फलंदाज गमावल्यानंतर रजत पाटीदार आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी चौथ्या विकेटसाठी 64 धावांची भागीदारी रचली. मात्र राहुल चहरने 26 धावा करणाऱ्या रजत पाटीदारला बाद करत ही जोडी फोडली.

40-3 : ऋषी धवनचे आरसीबीला धक्क्यावर धक्के

पाचव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर फाफ ड्युप्लेसिसला बाद केल्यानंतर ऋषी धवनने याच षटकात पाचव्या चेंडूवर महिपाल लोमरोरला 6 धावांवर बाद करत आरसीबीला तिसरा धक्का दिला.

 34-2 : विराट पाठोपाठ ड्युप्लेसिस देखील बाद

ऋषी धवनने आरसीबीला मोठा धक्का दिला. त्याने संघाचा कर्णधार फाफ ड्युप्लेसिसला 10 धावांवर बाद करत दुसरा सलामीवीर देखील माघारी धाडला.

33-1 आरसीबीला पहिला धक्का

पंजाब किंग्जचे 210 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या आरसीबीने दमदार सुरूवात करण्याचा प्रयत्न केला. विराट कोहलीने आक्रमक अंदाजात फलंदाजी करत 14 चेंडूत 20 धावांपर्यंत मजल मारली. मात्र कसिगो रबाडाचा एक लेग साईडचा चेंडू फटकावण्याच्या नादात त्याच्या बॅटची कडा लागली आणि शॉर्ट फाईनला उभ्या असलेल्या राहुल चहरच्या हातात झेल विसावला.

हर्षल पटेलचा शेवटच्या षटकात प्रभावी मारा

हर्षल पटेलने शेवटच्या षटकात प्रभावी मारा करत पंजाबला 9 बाद 209 धावात रोखले. हर्षल पटेलने शेवटच्या षटकात 2 विकेट घेतल्या.

207-8 : ऋषी धवन 7 धावांची भर घालून माघारी

 206-7 :अखेर हर्षलने घेतली लिव्हिंगस्टोनची विकेट

42 चेंडूत 70 धावांची तडाखेबाज खेळी करणाऱ्या लिम लिव्हिंगस्टोनला हर्षल पटेलने शेवटच्या षटकात बाद केले.

लिव्हिंगस्टोनचे दमदार अर्धशतक; पंजाब 200 पार 

बेअरस्टो बाद झाल्यानंतर डावाची सूत्रे आपल्या हातात घेतल्या लिम लिव्हिंगस्टोनने दमदार अर्धशतक ठोकले. त्याने हेजलवूडच्या 19 व्या षटकात 24 धावा चोपून पंजाबला 200 चा आकडा पार करून दिला.

173-6 : हर्षल पटेलचे जोरदार कमबॅक

हर्षल पटेलने पहिल्या स्पेलमध्ये मार खाल्यानंतर दुसऱ्या स्पेलमध्ये जोरदार कमबॅक केले. त्याने मयांक अग्रवाल पाठोपाठ हरप्रीत ब्रारची देखील विकेट घेत पंजाबला सहावा धक्का दिला.

164-5 : हसरंगाची अजून एक शिकार

वानिंदू हसरंगाने दमदार गोलंदाजी करत जितेश शर्माला 9 धावांवर बाद केले.

152-4 : कर्णधाराने साथ सोडली

बेअरस्टो बाद झाल्यानंतर लिम लिव्हिंगस्टोनने धडाकेबाज फलंदाजी करत पंजाबचा रनरेट 10 च्या वर ठेवला होता. मात्र त्याला साथ देणारा कर्णधार मयांक अग्रवाल 19 धावा करून बाद झाला.

101-3 : शाहबाजने दिला दिलासा

शाहबाज अहमदने 29 चेंडूत 66 धावांची आक्रमक खेळी करणाऱ्या जॉनी बेअरस्टोला बाद करत आरसीबीला मोठा दिलासा दिला.

85-2 : हसरंगाने राजपक्षाची केली शिकार

श्रीलंकेच्या भानुका राजपक्षाची विकेट त्याचाच देशबांधव वानिंदू हसरंगाने घेतली. त्याने राजपक्षाला 1 धावेवर बाद केले.

जॉनी बेअरस्टोचे दमदार अर्धशतक

पंजाब किंग्जकडून सलामीला यायला लागल्यापासून जॉनी बेअरस्टो दमदार खेळी करत आहे. आजच्या आरसीबीविरूद्धच्या महत्वाच्या सामन्यात बेअरस्टोने सलामीला येत दमदार अर्धशतक ठोकले.

60-1 : शिखर धवन बाद 

पंजाब किंग्जला ग्लेन मॅक्सवेलने पहिला धक्का दिला. त्याने शिखर धवनला 21 धावांवर बाद करत 60 धावांची सलामी देणारी बेअरस्टो - धवन जोडी फोडली.

आरसीबीने नाणेफेक जिंकली

रॉयल चॅलेंजर बेंगलोरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आरसीबीने आपल्या संघात कोणताही बदल केलेला नाही. तर पंजाबने आपल्या संघात एकच बदल केले आहे. संदीप शर्माच्या जागी हरप्रीत ब्रारला अंतिम 11 च्या संघात स्थान दिले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com