RR vs GT : 4,6,4,4 मिलरची किलर इनिंग; पाहा व्हिडिओ

IPL 2022 RR VS GT David Miller
IPL 2022 RR VS GT David MillerSakal

IPL 2022, RR vs GT : नवी मुंबईच्या डी.वाय. पाटील स्टेडियमवर डेविड मिलर (David Millers) नावाचे वादळ घोंगावल्याचे चित्र पाहायला मिळाले. आयपीएलच्या (IPL 2022) यंदाच्या हंगामातील सुरुवातीच्या सामन्यात तो नावाला साजेसा खेळ करण्यात अपयशी ठरत होता. पण अखेर त्याला सूर सापडला आहे. एकदा लयीत आला की काय असते याची झलक त्याने दाखवून दिली. मिलरने राजस्थान विरुद्ध किलर इनिंग खेळत आपल्या भात्यातील फटकेबाजीची झलक दाखवून दिली. गुजरातचा संघ त्याला सातत्याने संधी देत आहे. आज त्याने त्या संधीचं सोनं करुन दाखवला. त्याच्यात सामन्याला एकहाती कलाटणी देण्याची क्षमता आहे. पण गेल्या काही सामन्यात तो मोठी खेळी करण्यात अपयशी ठरताना दिसला. राजस्थान रॉयल्सविरुद्धची छोटी पण स्फोटक खेळी त्याचा आत्मविश्वास उंचावणारी निश्चितच आहे.

त्याने 14 चेंडूत 5 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 31 धावा कुटल्या. गुजरात टायटन्सच्या डावातील 19 व्या षटकात कुलदीप सेनच्या गोलंदाजीवर त्याने चौकार षटकारांची आतषबाजी करत (4,6,4,4) 20 धावा कुटल्या. कर्णधार हार्दिक पांड्याच्या साथीने अखेरच्या 25 चेंडूत डेविड मिलरने 53 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. ही खेळी संघासाठी चांगलीच फायदेशीर ठरल्याचे पाहायला मिळाले.

दक्षिण आफ्रिकेचा डावखुरा फलंदाज डेविड मिलरने 2012 च्या हंगामात पंजाबच्या संघाकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले. मागील दहा सामन्यात त्याच्याकडून नावाला साजेसा खेळ झालेला नाही. राजस्थान विरुद्ध 14 चेंडूत केलेली 31 धावांची खेळी त्याची सर्वोत्तम ठरलीये. पंजाब आणि राजस्थान या दोन फ्रेंचायझीकडून खेळल्यानंतर यंदाच्या हंगामात तो गुजरात टायटन्सच्या संघातून खेळताना दिसते. आयपीएलच्या मेगा लिलावात 3 कोटी मोजून गुजरातने त्याला आपल्या ताफ्यात घेतलं आहे. यंदाच्या हंगामात प्रत्येक सामन्यात तो प्लेइंग इलेव्हनचा भाग राहिला. 5 सामन्यातील 5 डावात त्याने 99 धावा केल्या असून आता तो राजस्थान विरुद्ध तो आपल्या खऱ्या तोऱ्यात खेळताना पाहायला दिसले. त्याचा हा तोरा गुजरातसाठी चांगलाच फायेदशीर ठरु शकतो. एकंदरीत आयपीएलचा विचार करता मिलरने 93 सामन्यातील 90 डावात 2073 धावा केल्या आहेत. नाबाद 101 धावा ही त्याची आयपीएलमधील सर्वोच्च खेळी आहे. मिलरकडून गुजरात संघाला अशाच कामगिरीची अपेक्षा आहे. सातत्याने मिळणाऱ्या संधीचा फायदा उठवत तो संघासाठी ट्रम्प कार्ड ठरणार का? ते येणारा काळच ठरवेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com