IPL 2022 : सलामी लढतीपूर्वी मुंबई इंडियन्सला धक्का!

IPL 2022
IPL 2022Sakal

इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 च्या हंगामाला सुरुवात होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन संघातील सामन्यात स्पर्धेला शुभारंभ होणार आहे. 27 मार्चला आयपीएलच्या सर्वाधिक ट्रॉफ्यी जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सची लढत ही पहिल्या ट्रॉफीच्या प्रतिक्षेत असलेल्या दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रंगणार आहे. या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्स संघाचे आणि त्यांच्या चाहत्यांना धक्का देणारे वृत्त समोर येत आहे. मुंबई इंडियन्सचा स्टार खेळाडू सलामीच्या सामन्याला मुकणार आहे.

आयपीएलच्या 15 व्या हंगामातील सलामीच्या लढतीत मुंबई इंडियन्सचा संघ स्टार आणि महत्त्वपूर्ण खेळाडू असलेल्या सुर्यकुमार यादवशिवाय मैदानात उतरु शकते. 31 वर्षीय सुर्यकुमार यादव हा दुखापतग्रस्त आहे. अंगठ्याला फॅक्चर झाले असून यातून तो अद्याप सावरलेला नाही. वेस्ट इंडीज विरुद्धच्या टी-20 सामन्यात सुर्यकुमार यादवला दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे त्याला श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेला मुकावे लागले होते. सध्याच्या घडीला सूर्या बंगळुरु स्थित राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये पुरवर्सनाची प्रक्रिया पूर्ण करत आहे. सलामीच्या लढतीसाठी तो संघाचा भाग असणे मुश्किल दिसते.

IPL 2022
मोठी बातमी! IPL २०२२ मध्ये DRS, प्लेइंग इलेव्हनच्या नियमात बदल

टाइम्स ऑफ इंडियाने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) एका सूत्राच्या हवाले दिलेल्या वृत्तानुसार, सुर्यकुमार यादव सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत रिहॅबिलिटेशन प्रक्रियेतून जात आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सला सलामीची लढत ही त्याच्याशिवाय खेळावी लागू शकते.

IPL 2022
साध्याभोळ्या कोचची थोडी गंमत; हार्दिक पांड्याचं वक्तव्य चर्चेत

मुंबई इंडियन्सने मेगा लिलावाआधी 4 खेळाडूंना रिटेन केले होते. यात कर्णधार रोहित शर्माशिवाय सुर्यकुमार यादवच्या नावाचा समावेश होता. इशान किशन, हार्दिक पांड्या आणि क्रुणाल पांड्या आधी मुंबई इंडियन्सने सुर्यावर विश्वास दाखवला होता. सुर्यकुमार यादव 2 एप्रिलला राजस्थान विरुद्धच्या सामन्यावेळी मैदानात उतरण्याची शक्यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com