VIDEO : उमरानचा खतरनाक यॉर्कर; श्रेयसच्या बोल्डवर 'स्टेनगन' हसली

आघाडीचे फलंदाज स्वस्तात माघारी फिरल्यानंतर कोलकाताचा कर्णधार श्रेयस अय्यर संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न करत होता. तो सेट होतोय असे वाटत असताना...
Umran Malik vs Shreyas Iyer
Umran Malik vs Shreyas IyerSakal

इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 स्पर्धेतील सनरायजर्स हैदराबाद (SRH) आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) यांच्यातील 25 वा सामना मुंबईतील ब्रेबॉर्नच्या मैदानात रंगला आहे. यंदाच्या स्पर्धेत 150 किमीप्रति तास वेगाने गोलंदाजी करुन लक्ष वेधणाऱ्या उमरान मलिकने (Umran Malik) पुन्हा एकदा आपल्या भेदक माऱ्यातील ताकद दाखवून दिली. कोलकाता विरुद्धच्या सामन्यात आपल्या कोट्यातील चार षटकात 27 धावा खर्च करत त्याने दोन विकेट्स मिळवल्या. यातील त्याने कोलकाताचा कर्णधार आणि भारतीय संघातील स्टार बॅटर श्रेयस अय्यरची (Shreyas Iyer) घेतलेली विकेट कमालीची होती.

उमरान मलिकनं उत्तम यॉर्कर लेंथ चेंडू टाकून श्रेयस अय्यरला बोल्ड केलं. आघाडीचे फलंदाज स्वस्तात माघारी फिरल्यानंतर कोलकाताचा कर्णधार श्रेयस अय्यर संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न करत होता. तो सेट होतोय असे वाटत असताना 10 व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर उमरान मलिकनं अप्रतिम चेंडूवर त्याला यष्टीचित केलं. श्रेयस अय्यरने बॅकफूटवर जात चेंडू ऑफच्या दिशेनं टोलवण्याचा प्रयत्न केला. पण तो फसला. उमरानचा खतरनाक यॉर्कर लेंथ चेंडूनं मिडल आणि ऑफ स्टम्प भेदली. श्रेयस अय्यरच्या विकेटनंतर सनरायजर्स हैदराबादचा गोलंदाजी कोच डेल स्टेनची प्रतिक्रिया बघण्याजोगी होती. याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय.

Umran Malik vs Shreyas Iyer
KKR vs SRH : अनोख्या विक्रमी सामन्यात फिंचचा फ्लॉप शो!


हैदराबादनं उमरान मलिकला चार कोटीतं केलं होतं रिटेन

सनरायजर्स हैदराबाद संघाने उमरान मलिकवर विश्वास दाखवत मेगा लिलावाआधी त्याला चार कोटीत रिटेन केले होते. टी 20 वर्ल्ड कप 2021 वेळी तो भारतीय संघासोबत होता. नेट गोलंदाज म्हणून त्याची निवड झाली होती. आयपीएलच्या गत हंगामात त्याला केवळ 3 सामन्यात संधी मिळाली होती. पण यंदाच्या हंगामात त्याला प्रत्येक सामन्यात संधी मिळताना दिसतेय.

Umran Malik vs Shreyas Iyer
IPL च्या बायोबबलमध्ये कोरोनाचा शिरकाव; दिल्लीच्या ताफ्यात खळबळ

कोलकाता विरुद्धच्या सामन्यापूर्वी काश्मीरच्या या पोरानं 7 आयपीएल सामन्यात 5 विकेट घेतल्या होत्या. उमरान मलिकने गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात यंदाच्या हंगामातील सर्वात वेगवान चेंडू फेकला होता. त्याने टाकलेला 153.3 किमी/तास चेंडूचीही चांगलीच चर्चा रंगली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com