
संजय बांगरने दिनेश कार्तिकला फलंदाजी करण्यापासून का रोखलं?
आयपीएल 2022 च्या 43 वा सामना गुजरात टायटन्सचा आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळल्या गेला. बंगळुरूने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. फॅफ डू प्लेसिस आणि विराट कोहली सलामीसाठी आले. प्रदीप सांगवानने दुसऱ्याच षटकात फॅफला बाद केले. यानंतर रजत पाटीदारने विराटसोबत 99 धावांची भागीदारी केले. विराट आणि पाटीदार बाद झाल्यानंतर ग्लेन मॅक्सवेल आणि दिनेश कार्तिक क्रीझवर आले. कार्तिकला (Dinesh Karthik) पाटीदार आऊट होताच यायचे होते, पण प्रशिक्षक संजय बांगर यांनी त्याला खेळायला जाण्यास रोखले.
कार्तिक या हंगामात चांगलाच फॉर्मात आहे. आरसीबीला त्याने तीन सामने जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली असून. या सामन्यापूर्वी दिनेश आठपैकी सहा सामन्यात अपराजित होता. दिनेशने या आठ सामन्यांत 198 च्या स्ट्राईक रेटने 216 धावा केल्या आहेत. अखेरीस मॅक्सवेल बाद झाल्यानंतर दिनेशला क्रीजवर आला. कार्तिक क्रीझवर येताच हार्दिक पंड्याने रशीद खानकडे चेंडू दिला. 19 व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर कार्तिकने रशीदला फाइन लेगवर खेळवण्याचा प्रयत्न केला, पण तो जोडू शकला नाही आणि मोहम्मद शमीने एक सोपा झेल घेतला. आणि कार्तिक तीन चेंडूत दोन धावा करून बाद झाला.
बंगळुरूने त्यांच्या डावात 170 धावा केल्या आणि गुजरातने 174 धावा करत आरसीबीचा सहा गडी राखून पराभव केला. मात्र या सामन्यात कार्तिकऐवजी अनुज रावत विकेटकीपिंग ग्लोव्हज घालून मैदानात आल्याने चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला. गेल्या अनेक सामन्यांमध्ये संघासाठी फिनिशरची भूमिका बजावणाऱ्या यष्टिरक्षक दिनेश कार्तिकची अचानक प्रकृती खालावली होते. त्यामळे तो मैदानात फील्डिंगसाठी आला नाही. आरसीबीचा पुढील सामना 4 मे रोजी चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध एमसीए स्टेडियमवर होणार आहे.