
बर्थडे बॉय' रोहितची विकेट, रितिका वहिनींच्या डोळ्यांत पाणी
IPL 2022 : आयपीएलचा 44 वा सामना मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यात खेळला गेला. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) त्याचा 35 वा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसादिवशी रोहित मोठी खेळी करेल, अशी सर्वांना अपेक्षा होती, पण तसे होऊ शकले नाही. रोहित शर्मा राजस्थान रॉयल्सविरुद्ध अवघ्या 2 धावांवर बाद झाला. त्याचा खराब फॉर्म अजूनही कायम राहिला आहे. रोहित शर्मा आऊट झाल्यावर त्याची पत्नी रितिकाच्या (Ritika Sajdeh) डोळ्यांत पाणी आले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.(Rohit Sharma Wife Ritika Reaction)
हेही वाचा: अस्तित्व टिकवण्यासाठी चेन्नईचा आज हैदराबादविरुद्ध सामना
रविचंद्रन अश्विनचा चेंडूवर रोहित शर्माने बॅट फिरवली चेंडू हवेत जाताच रितिकाची प्रतिक्रिया पाहण्यासारखे होते. रितिका झेल सुटावा म्हणून प्रार्थना करत होती. पण रोहित शर्मा आऊट झाला. ३५ वर्षांचा झालेला हिटमॅन या हंगामात खराब फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे वाढदिवस त्याच्यासाठी संस्मरणीय ठरू शकला नाही. आत्तापर्यंत रोहित शर्माने आयपीएल 2022 मध्ये 9 सामने खेळले आहे, ज्यामध्ये 17 च्या सरासरी केवळ 155 धावा करू शकला आहे.
हेही वाचा: पंजाबला हरवूनही राहुल संतापला; फलंदाजांवर ओरडत म्हणाला, 'मूर्खासारखं...'
मुंबई इंडियन्स आणि टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छाचा पाऊस पडत होता. हॅपी बर्थडे रोहित सोशल मीडियावर दिवसभर ट्रेंडमध्ये राहिला होता, चाहत्यांनी त्यांच्या आवडत्या कर्णधाराला शुभेच्छा दिल्या. यासोबतच टीम इंडियाच्या सहकारी खेळाडूंनी रोहितला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने पाचवेळा विजेतेपद पटकावले आहे.
Web Title: Rohit Sharma Wife Ritika Sajdeh Reaction Rohit Failed On Birthday Match Mi Vs Rr Ipl 2022
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..