सचिन, गंभीर अन् मी असं कधीच वागलो नाही; विरुनं घेतली गिलची शाळा

GT Opener Shubman Gill
GT Opener Shubman Gill Sakal

मुंबई : आयपीएल स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात शून्यावर बाद झालेल्या गुजरात टायटन्सच्या ओपनर आणि भारताच्या युवा सलामीवीराची विरेंद्र सेहवागनं (Virender Sehwag) शाळा घेतलीये. लखनऊ सुपर जाएंट्स (Lucknow Super Giants ) विरुद्धच्या सामन्यात शुबमन गिलनं (Shubman Gill ) गुजरात टायटन्सच्या (Gujarat Titans )डावाची सुरुवात करण्यासाठी आला होता. तीन चेंडूचा सामना करुन तो शून्यावर बाद झाला. त्याचे शॉट सिलेक्शन सेहवागला अजिबात पटलं नाही. काही दिवसांपूर्वीच शुबमन गिलने आपल्या भात्यात एक नव्या चीकी (Cheeky) शॉट्चा समावेश केल्याचे सांगितले होते. क्रिजमध्ये उतरल्या उतरल्या हा फटका मारण्याची काहीच गरज नव्हती, असे सेहवागने म्हटले आहे. (IPL 2022 Virender Sehwag Slams GT Opener Shubman Gill )

GT Opener Shubman Gill
GT vs LSG : कोण आहे Ayush Badoni, ज्यानं राशिदला केलं हतबल

सेहवागने सलामीवीर शुबमन गिलच्या शॉट सिलेक्शनवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत करताना स्वत:सह मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि माजी सलामीवीर गौतम गंभीर यांचाही दाखला दिलाय. तुमच्या भात्यातला असा नवा फटका बाहेर काढण्याची एक वेळ असते. जेव्हा तुम्ही 70-80 धावांपर्यंत पोहचता त्यावेळी तुम्ही असा प्रयोग करु शकता. नवं आणि वेगळ्या धाटणीचा फटका क्रिजमध्ये उतरल्या उतरल्या खेळायचा नसतो. सचिन तेंडुलकर, गौतम गंभीर आणि मी देखील असे फटके मारले आहेत. पण यासाठी आम्ही कधीच गडबड केली नाही.

GT Opener Shubman Gill
Video: भावानेच काढला भावाचा काटा; पांड्या बंधूत कृणाल पडला भारी

क्रिजवर उतरल्यानंतर स्ट्राइक रेट वाढवून असा प्रयोग करायचा असतो. 25-30 धावांवर गेल्यावर शुबमन गिलने हा फटका खेळायला हवा होता, असे सेहवाग क्रिकबझशी संवाद साधताना म्हणाला आहे. गिल हा वनडे आणि टी-20 तील सर्वोत्तम फलंदाज आहे, असे सांगायलाही सेहवाग विसरला नाही. गिलनं मैदानात उतरल्यानंतर पहिल्यांदा स्थिर होण्याचा प्रयत्न करावा. नैसर्गिक खेळी करुन आधी थोड्या काढाव्या आणि मग त्याने नव्याने शिकलेला फटका ट्राय करावा, असा सल्लाही सेहवागने गिलला दिलाय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com