RCB विरुद्धच्या LIVE सामन्यात लखनौचा बदलला कर्णधार! राहुलसोबत घडली मोठी घटना, रडत रडत मैदानाबाहेर

KL Rahul Injury IPL 2023
KL Rahul Injury IPL 2023

KL Rahul Injury IPL 2023 : आयपीएल 2023 च्या 43 व्या सामन्यात आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ लखनौ सुपर जायंट्ससमोर आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पण सामना सुरू होताच लखनौच्या संघाला मोठा धक्का बसला. लखनौचा कर्णधार केएल राहुल मैदान सोडून बाहेर गेला आहे. यानंतर त्याच्या अनुपस्थितीत कृणाल पांड्याने संघाची कमान सांभाळली आहे.

KL Rahul Injury IPL 2023
टीम इंडियातून बाहेर... लिलावात अनसोल्ड... IPL मध्ये केली मराठी कॉमेंट्री... पण अखेर 'तो' परतला

लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुलला सामन्याच्या दुसऱ्याच षटकात दुखापत झाली. खंर तर क्षेत्ररक्षण करताना तो जखमी झाला. दुखापत इतकी गंभीर होती की तो वेदनेने रडत मैदानाबाहेर गेला. मात्र त्याच्या दुखापतीबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नसून, काही गंभीर परिस्थिती निर्माण होणार नाही, अशी अपेक्षा आहे. दुखापत गंभीर झाली तर लखनौसाठी तो मोठा धक्का असेल.

लखनौ आणि आरसीबी यांनी आयपीएलमध्ये आतापर्यंत फक्त 3 सामने आमनेसामने खेळले आहेत. एलएसजीने 1 तर आरसीबीने 2 सामने जिंकले आहेत. गेल्या मोसमात एलिमिनेटरसह दोन्ही सामन्यांमध्ये आरसीबीने लखनौचा पराभव केला होता. लखनौच्या एकना क्रिकेट स्टेडियमवर दोन्ही संघ प्रथमच भिडतील. या हंगामाच्या सुरुवातीला जेव्हा हे संघ आमनेसामने आले होते, तेव्हा लखनौ जिंकले होते.

आयपीएल 2023 च्या 43 व्या सामन्यात दोन्ही संघ :

लखनौ सुपर जायंट्स : केएल राहुल (क), काइल मेयर्स, दीपक हुडा, मार्कस स्टोइनिस, कृणाल पंड्या, निकोलस पूरन (विकेटकीपर), कृष्णप्पा गौतम, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक, अमित मिश्रा, यश ठाकूर

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (क), अनुज रावत, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), सुयश प्रभुदेसाई, वानिंदू हसरंगा, कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज, जोश हेझलवूड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com