टीम इंडियातून बाहेर... लिलावात अनसोल्ड... IPL मध्ये केली मराठी कॉमेंट्री... पण अखेर 'तो' परतला

तो परत आला...! IPL 2023 मध्ये करत होता कॉमेंट्री आता थेट...
 
Kedar Jadhav
Kedar Jadhavsakal

Kedar Jadhav IPL 2023 : इंडियन प्रीमियर लीग 2023 मध्ये एकापेक्षा एक धक्कादायक गोष्टी पाहायला मिळाल्या आहेत. आयपीएलमध्ये आणखी एक अशी बातमी समोर आली आहे जी तुम्हाला आश्चर्यचकित करेल. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या हंगामातील 42 सामने पूर्ण झाल्यानंतर एका नव्या खेळाडूचा त्यांच्या संघात समावेश केला आहे.

आश्चर्याची बाब म्हणजे आरसीबीने मधल्या फळीतील फलंदाज केदार जाधवला त्यांच्या संघात स्थान दिले आहे. हा उजव्या हाताचा फलंदाज 2021 मध्ये शेवटची आयपीएल खेळला होता आणि आता अचानक रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने त्याला आपल्या संघात संधी दिली आहे.

 
Kedar Jadhav
IPL 2023: मराठमोळ्या केदार जाधवची RCBमध्ये एन्ट्री! बंगळुरूने 38 वर्षीय खेळाडूला 1 कोटी का केले खरेदी?

आयपीएल लिलावात केदार जाधव वर कोणत्याही संघाने बोली लावली नव्हती. तो लिलावात अनसोल्ड राहिला होता पण डेव्हिड विलीच्या दुखापतीनंतर त्याला आरसीबीने सामील केले आहे. डेव्हिड विली दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला आहे. केदार जाधव 38 वर्षांचा आहे आणि गेल्या दोन मोसमात त्याने अर्धशतक झळकावले नाही पण तरीही आरसीबीने त्याला विकत घेतले आहे.

आयपीएल लिलावात विकले न गेल्याने केदार जाधव कॉमेंट्री करत होता. हा खेळाडू आयपीएल 2023 मध्ये मराठीत क्रिकेट कॉमेंट्री करत होता. जिओ सिनेमात त्याला क्रिकेट एक्स्पर्ट म्हणून पाहिले जात होते. पण आता हा खेळाडू कॉमेंट्री सोडून क्रिकेटच्या मैदानात उतरणार आहे.

 
Kedar Jadhav
WTC फायनल जिंकण्यासाठी भारतीय दिग्गजाचा मास्टर स्ट्रोक! 'या' ऑस्ट्रेलियन खेळाडूला घेतले संघात

इंडियन प्रीमियर लीग 2022 मध्येही बंगळुरू फ्रँचायझीने दिनेश कार्तिकचा आपल्या संघात समावेश केला होता, जो त्याआधी भारत आणि आयपीएलच्या सामन्यांमध्ये कॉमेंट्री करत होता, परंतु त्याने 2022 च्या हंगामात अप्रतिम कामगिरी केली आणि भारतीय संघात आपले स्थान परत केले. आता हेच काम केदार जाधव करू शकतो की नाही हे पाहावं लागेल.

केदार जाधवने टीम इंडियासाठी शेवटचा एकदिवसीय सामना 10 ऑक्टोबर 2017 रोजी गुवाहाटी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता. 08 फेब्रुवारी 2020 रोजी ऑकलंड येथे न्यूझीलंडविरुद्ध शेवटचा T20 सामना खेळला आहे. बऱ्याच दिवसांपासून तो टीम इंडियातून बाहेर आहे.

 
Kedar Jadhav
LSG vs RCB: IPL चाहत्यांसाठी वाईट बातमी! लखनौ-आरसीबी सामना रद्द होणार?

आता प्रश्न असा आहे की आरसीबीने केदार जाधवला का विकत घेतले? डेव्हिड विलीऐवजी दुसऱ्या परदेशी खेळाडूला संधी देऊ शकली असती, पण जाधवला विकत घेण्याचे कारण म्हणजे त्याची फलंदाजी.

खरं तर, आरसीबीची समस्या अशी होती की विराट, डुप्लेसिस आणि मॅक्सवेल यांच्याशिवाय दुसरा कोणताही फलंदाज धावा काढत नाही. ही उणीव दूर करण्यासाठी त्यानी जाधवला संघात आणले आहे. जाधवकडे अनुभव असून तो लांब षटकार मारण्यासाठी ओळखला जातो.

केदार जाधव 2021 मध्ये शेवटचा आयपीएल सामना खेळला होता. या खेळाडूने गेल्या चार हंगामात 29 सामने खेळले ज्यात त्याला केवळ एक अर्धशतक झळकावता आले. जाधवचा स्ट्राईक रेट 123.17 आहे आणि त्याची सरासरीही 21च्या वर आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com