Rohit Sharma IPL 2023: वानखेडे स्टेडियमवरील पराभव मुंबईच्या जिव्हारी, पंजाबविरुद्ध घेणार का बदला?

रोहित शर्माच्या फॉर्म चिंता! पराभवाची परतफेड करण्यासाठी मुंबई सज्ज
Rohit Sharma new record ipl
Rohit Sharma new record ipl SAKAL

IPL 2023 : पाच वेळचे विजेते मुंबई इंडियन्स आणि पहिल्यावहिल्या जेतेपदाची प्रतीक्षा असलेले पंजाब किंग्स यांच्यामध्ये आज आयपीएलची लढत रंगणार आहे. पंजाब किंग्सने यंदाच्या मोसमात वानखेडे स्टेडियमवर झालेल्या लढतीत यजमान मुंबई इंडियन्सवर 13 धावांनी विजय मिळवला होता.

हा पराभव मुंबई इंडियन्सच्या जिव्हारी लागला. या पराभवाची परतफेड करण्यासाठी मुंबई इंडियन्सचा संघ आज मैदानात उतरेल. याचसोबत प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्याच्या दृष्टीने दोन्ही संघांसाठी आजची लढत महत्त्वाची असणार आहे.

Rohit Sharma new record ipl
Kohli Vs Gambhir : मैदानावर कोहली-गौतमच्या भांडणावर यूपी पोलिसांचे ट्विट व्हायरल

मुंबईसाठी कर्णधार रोहित शर्माचा फलंदाजी फॉर्म चिंतेचा ठरत आहे. तसेच भारतीय संघ ७ जूनपासून ओव्हलमध्ये खेळवण्यात येणाऱ्या जागतिक कसोटी स्पर्धेच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाचा सामना करणार आहे.

या लढतीसाठीही तो तंदुरुस्त राहावा यासाठी आयपीएलमधील काही सामन्यांमधून तो माघार घेण्याची शक्यता आहे, पण ज्या आयपीएल लढतींमध्ये तो खेळेल, त्या लढतींमध्ये त्याच्या बॅटमधून धावा निघायला हव्यात. यामुळे जागतिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत तो आत्मविश्‍वासाने मैदानात उतरू शकतो.

Rohit Sharma new record ipl
Mohammed Shami Hasin Jahan: 'हॉटेलमध्ये मुलींसोबत...' पत्नी हसीन जहाँने मोहम्मद शमीवर गंभीर केले आरोप

मुंबईच्या फलंदाजांनी राजस्थानविरुद्धच्या मागील लढतीत २१३ धावांचे आव्हान पार करीत स्पर्धेतील आव्हान कायम ठेवले. तिलक वर्मा (२४८ धावा), कॅमेरून ग्रीन (२४३ धावा), इशान किशन (२११ धावा), सूर्यकुमार यादव (२०१ धावा), टीम डेव्हिड (१५८ धावा) यांच्या खांद्यावर मुंबईच्या फलंदाजीची भिस्त आहे. उर्वरित सहाही लढतींमध्ये या सर्व फलंदाजांकडून चमकदार कामगिरीची अपेक्षा आहे.

मुंबईच्या गोलंदाजी विभागाला सातत्यपूर्ण कामगिरी अद्याप करता आलेली नाही. जोफ्रा आर्चर, पियूष चावला यांनी मागील लढतीत ठसा उमटवला, पण रायली मेरेडीथ, कुमार कार्तिकेय, कॅमेरून ग्रीन यांच्याकडून अव्वल दर्जाची कामगिरी अजून झालेली नाही. अर्शद खानने राजस्थानविरुद्धच्या लढतीत तीन विकेट घेतल्या असल्या, तरी त्याला धावा रोखता आलेल्या नाहीत.

Rohit Sharma new record ipl
IPL 2023 : 'सर्वतोपरी प्रयत्न केला पण...' दिल्लीकडून सामना हरल्यानंतर हार्दिक पांड्याला फलंदाजांवर संतापला

सातत्यपूर्ण कामगिरीचा अभाव

पंजाबच्या संघाला यंदाच्या मोसमात सातत्यपूर्ण कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे पंजाबला चढ-उतारामधून जावे लागत आहे. पंजाबने ९ सामन्यांमधून ५ सामन्यांमध्ये विजय मिळवले असून चार सामन्यांमध्ये त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. कर्णधार शिखर धवन वगळता पंजाबच्या फलंदाजांना प्रभाव टाकता आलेला नाही.

प्रभसिमरन सिंग, अथर्व तायडे, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन, जितेश शर्मा, शाहरूख खान व सिकंदर रझा यांनी फलंदाजीत उल्लेखनीय कामगिरी केल्यास पंजाबला विजयाची आशा करता येणार आहे. अर्शदीप सिंग, कागिसो रबाडा, सॅम करन, राहुल चहर या गोलंदाजांना उद्या मुंबईच्या फलंदाजांना रोखावे लागणार आहे.

  • पहिली लढत - लखनौ सुपर जायंटस्‌ - चेन्नई सुपरकिंग्स

    स्थळ - लखनौ वेळ - दुपारी ३.३० वाजता

  • दुसरी लढत - पंजाब किंग्स - मुंबई इंडियन्स

    स्थळ - मोहाली वेळ - रात्री ७.३० वाजता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com