IPL 2023 Points Table: मोठी उलथापालथ! एका विजयासह RR टॉप-3 मध्ये; KKRच्या पराभवाचा RCBला फायदा

पॉइंट टेबल मध्ये मोठा बदल
IPL 2023 Points Table
IPL 2023 Points Table

IPL 2023 Points Table : आयपीएल 2023 मध्ये 11 मे (गुरुवार) पर्यंत लीग टप्प्यातील 70 पैकी 56 सामने खेळल्या गेल्या आहेत. पण अजूनही प्लेऑफचे चित्र पूर्णपणे स्पष्ट झालेले नाही. गतविजेता गुजरात टायटन्स 16 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे, तर चेन्नई सुपर किंग्ज 15 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. राजस्थान रॉयल्सने एका दिवसापूर्वी कोलकाता नाईट रायडर्सवर 9 गडी राखून दणदणीत विजय मिळवत टॉप-3 मध्येही प्रवेश केला आहे.

IPL 2023 Points Table
IPL : मुंबई इंडियन्स आज गुजरातला रोखणार ?

राजस्थान रॉयल्सने कोलकाता नाईट रायडर्ससमोर दिलेले 150 धावांचे लक्ष्य 41 चेंडूत आणि 9 गडी राखून पूर्ण केले. या विजयामुळे रॉयल्सच्या निव्वळ धावगतीमध्येही बरीच सुधारणा झाली आणि संघ पाचव्या स्थानावरून थेट तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सला चौथ्या तर लखनौ सुपर जायंट्सला पाचव्या क्रमांकावर यावे लागले.

आता राजस्थानचे 12 सामन्यांत 6 विजयांसह 12 गुण झाले आहेत. त्याचा निव्वळ रन रेट (0.633) झाला आहे, जो दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या चेन्नई सुपर किंग्सपेक्षा (0.493) चांगला आहे. मुंबई इंडियन्सचेही 11 सामन्यांतून राजस्थानच्या बरोबरीचे 12 गुण आहेत. पण नेट रन रेटमुळे (-0.255) मुंबई चौथ्या स्थानावर आहे.

IPL 2023 Points Table
Yashasvi Jaiswal Virat Kohli : यशस्वी जैसवालच्या रेकॉर्डब्रेक खेळीवर विराटची आली पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...

दुसरीकडे, राजस्थान रॉयल्सकडून सामना हरल्यानंतर कोलकाता नाईट रायडर्स सहाव्या क्रमांकावरून सातव्या स्थानावर घसरला आहे. केकेआरच्या पराभवाचा फायदा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला झाला असून तो एका स्थान वर गेला आहे. सध्या आरसीबी सहाव्या स्थानावर आहे.

तीन संघ बेंगळुरू, कोलकाता आणि पंजाबचे प्रत्येकी 10 गुण आहेत. पराभवामुळे केकेआरचे मोठे नुकसान झाले आहे. त्याच्याकडे 12 सामन्यांत 10 गुण आहेत आणि तो जास्तीत जास्त 14 गुणांपर्यंत पोहोचू शकतो. तर पंजाब किंग्ज आणि बंगळुरू यांच्यात 3-3 सामने आहेत. म्हणजेच, जास्तीत जास्त दोन्ही संघ 6 अधिक गुण मिळवू शकतात आणि 16 गुणांपर्यंत पोहोचू शकतात.

अशा परिस्थितीत एका पराभवाने केकेआरचा प्लेऑफमधील मार्ग कठीण झाला आहे. आता कोलकाताला त्यांचे उर्वरित दोन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागतील. यासोबतच इतर संघांच्या निकालावरही अवलंबून रहावे लागणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com