IPL 2023: मराठमोळ्या केदार जाधवची RCBमध्ये एन्ट्री! बंगळुरूने 38 वर्षीय खेळाडूला 1 कोटी का केले खरेदी?

Kedar Jadhav IPL 2023
Kedar Jadhav IPL 2023

Kedar Jadhav IPL 2023 : आयपीएलच्या 16 व्या हंगामात दुखापतग्रस्त खेळाडूंमुळे काही संघाच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. आता रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने जखमी डेव्हिड विलीच्या जागी केदार जाधवला त्यांच्या संघाचा भाग बनवण्याची घोषणा केली आहे.

आरसीबीने जाधवला त्याच्या मूळ किमतीवर म्हणजे 1 कोटी रुपये देऊन संघात समाविष्ट केले आहे. विली या हंगामात आरसीबीसाठी केवळ 4 सामने खेळू शकला, ज्यामध्ये त्याने 3 विकेट घेतल्या.

Kedar Jadhav IPL 2023
WTC फायनल जिंकण्यासाठी भारतीय दिग्गजाचा मास्टर स्ट्रोक! 'या' ऑस्ट्रेलियन खेळाडूला घेतले संघात

केदार जाधवबद्दल सांगायचे तर, कोणत्याही फ्रँचायझीने त्याला या आयपीएल हंगामासाठी त्यांच्या संघाचा भाग बनवले नाही. यानंतर तो जिओ सिनेमासाठी मराठी भाषेत समालोचनाची भूमिका करत होता. 2010 च्या मोसमात केदार जाधवने आयपीएलमध्ये पदार्पण केले.

आयपीएलमध्ये केदार जाधवने आतापर्यंत 93 सामने खेळले असून त्यापैकी 80 डावात फलंदाजी करताना 22.15 च्या सरासरीने एकूण 1196 धावा केल्या आहेत. यादरम्यान जाधवच्या बॅटमधून 4 अर्धशतकांच्या खेळी पाहायला मिळाल्या. जाधव यापूर्वीही आरसीबी संघाचा भाग होता, ज्यामध्ये त्याला संघाकडून एकूण 17 सामने खेळण्याची संधी मिळाली.

Kedar Jadhav IPL 2023
LSG vs RCB: IPL चाहत्यांसाठी वाईट बातमी! लखनौ-आरसीबी सामना रद्द होणार?

आयपीएलच्या या हंगामातील आरसीबीच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर 8 सामने खेळल्यानंतर संघाने केवळ 4 सामने जिंकले आहेत. या हंगामात आतापर्यंत संघासाठी एक समस्या निर्माण झाली आहे ती म्हणजे मधल्या फळीकडून अपेक्षेप्रमाणे कामगिरी न करणे. त्यामुळेच केदार जाधवला संघात सामील करून घेण्याचा निर्णय घेतल्याने तो मधल्या फळीला बळकट करता येईल असे पाहिले जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com