IPL 2024 Auction : पंजाब किंग्ज 18.50 कोटी रूपयांच्या खेळाडूला करणार रिलीज; कमिन्स, रचिन रविंद्रवर असणार सर्वांच लक्ष?

IPL 2024 Auction
IPL 2024 Auctionesakal

IPL 2024 Auction : भारतातील वनडे वर्ल्डकप संपतो न संपतो तोच इंडियन प्रीमियर लीगचं वारं देशभरात वाहू लागलं आहे. आयपीएल 2024 चा लिलाव जवळ आला असून फ्रेंचायजींसाठी रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची नावे निश्चित करण्यासाठी आता अवघे काही दिवस राहिले आहेत.

फ्रेंचायजींना आपल्या रिटेन आणि रिलीज खेळाडूंची यादी सादर करण्याची शेवटची तारीख ही 26 नोव्हेंबर आहे. त्यातच क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार पंजाब किंग्ज आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू सॅम करनला रिलीज करण्याची शक्यता आहे.

IPL 2024 Auction
WPL 2024 Auction : वुमन्स प्रीमियर लीगच्या लिलावाची तारीख ठरली, फ्रेंचायजींच्या सॅलरी पर्समध्ये मोठी वाढ?

क्रिकबझच्या वृत्तानुसार हॅरी ब्रूक, सॅम करन, टीम साऊदी, लॉकी फर्ग्युसन आणि शार्दुल ठाकूर सारखा खेळाडू देखील रिलीज केला जाऊ शकतो. मात्र कोलकाता नाईट रायडर्स आंद्रे रसेलला सोडण्याची शक्यता कमी आहे. दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्स देखील मोठा बदल करण्याची शक्यता आहे. मात्र तो बदल काय असेल हे अजून गुलदस्त्यातच आहे.

नुकत्याच झालेल्या वनडे वर्ल्डकपमधील काही चमकलेली नावे देखील यंदाचा आयपीएल लिलाव (IPL Auction) गाजवू शकतात. यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, ट्रॅविस हेड, अष्टपैलू रचिन रविंद्र आणि डॅरल मिचेल या नावांचा समावेश आहे.

IPL 2024 Auction
Yuzvendra Chahal : हीच खरी योध्याची ताकद... वगळलेल्या युझवेंद्रची दमदार कामगिरीसह धमाकेदार पोस्ट

यंदाच्या मिनी लिलावात जवळपास 50 खेळाडू असण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. आयपीएलचा हंगाम मार्च महिन्याच्या मध्यावर सुरू होण्याची शक्यता आहे. आयपीएल ही भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांची मालिका झाल्यानंतर होईल. ही मालिका 11 मार्चला संपणार आहे.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com