CSK Schedule IPL 2024 : MS धोनी 'या' मैदानावर दिसणार शेवटचा खेळताना? जाणून घ्या CSK संघाचे संपूर्ण शेड्युल

IPL 2024 Chennai super kings Schedule : चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल 2024 च्या हंगामाची सुरूवात विजयाने केली.
CSK Schedule IPL 2024 News Marathi
CSK Schedule IPL 2024 News Marathi

IPL 2024 Chennai super kings Schedule : चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल 2024 च्या हंगामाची सुरूवात विजयाने केली. सीएसकेने आपला पहिला सामना 22 मार्च रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू विरुद्ध खेळला, ज्यात 6 विकेट्सने विजय मिळवला. दुसऱ्या सामन्यात सीएसकेचा सामना गुजरात टायटन्सशी 26 मार्चला त्याच्या घरच्या मैदानावर एमए चिदंबरम स्टेडियमवर भिडणार आहे.

CSK Schedule IPL 2024 News Marathi
ऑस्ट्रेलियाची घोषणा! 1991-92 नंतर पहिल्यांदाच घडणार... IND vs AUS कसोटी मालिकेसाठी घेतला मोठा निर्णय

दरम्यान, एक मोठी बातमी समोर येत आहे. आयपीएल 2024 मधील चेन्नई सुपर किंग्जचे सर्व लीग सामने BCCI ने जाहीर केले आहेत. यापूर्वी लोकसभा निवडणुकामुळे बोर्डाने केवळ 21 सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले होते. आता आयपीएल 2024 मधील सीएसकेच्या सर्व लीग सामन्यांबद्दल जाणून घेऊया...

गतविजेता चेन्नई सुपर किंग्ज 17 व्या हंगामातील लीग टप्प्यात 14 सामने खेळणार आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स या हंगामात फक्त एकदाच भिडणार आहे. चेन्नई सुपर किंग्जचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा हा शेवटचा हंगाम असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या हंगामात धोनी ज्या ज्या मैदानावर जाईल येथे चाहत्यांची गर्दी नक्की दिसेल.

आयपीएल 2024 मध्ये चेन्नई सुपर किंग्जचा शेवटचा साखळी सामना 18 मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूशी होणार आहे. ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली सीएसके क्वालीफायर झाली नाही तर, महेंद्रसिंग धोनीचा बेंगळुरूच्या मैदानावर शेवटचा खेळताना दिसू शकतो.

CSK Schedule IPL 2024 News Marathi
MI vs CSK IPL 2024 : ठरलं तर मग... एकच होणार एल क्लासिको! पांड्याच्या होम ग्राऊंडवर ऋतुराजची CSK 'या' तारखेला देणार MI ला टक्कर

चेन्नई सुपर किंग्जचे संपूर्ण वेळापत्रक (IPL 2024 Chennai Super Kings Schedule)

  • 22 मार्च - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, चेन्नई (संध्या. 7.30 वाजता)

  • 26 मार्च - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स, चेन्नई (संध्या. 7.30 वाजता)

  • 31 मार्च - दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, विशाखापट्टणम (संध्या. 7.30 वाजता)

  • 5 एप्रिल - सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, हैदराबाद (संध्या. 7.30 वाजता)

  • 8 एप्रिल - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, चेन्नई (संध्या. 7.30 वाजता)

  • 14 एप्रिल - मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, मुंबई (संध्या. 7.30 वाजता)

  • 19 एप्रिल - लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, लखनौ (संध्या. 7.30 वाजता)

  • 23 एप्रिल - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स, चेन्नई (संध्या. 7.30 वाजता)

  • 28 एप्रिल - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, चेन्नई (संध्या. 7.30 वाजता)

  • 1 मे - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्स, चेन्नई (संध्या. 7.30 वाजता)

  • 5 मे - पंजाब किंग्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, धरमशाला (दु. 3.30 वाजता)

  • 10 मे - गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, अहमदाबाद (संध्या. 7.30 वाजता)

  • 12 मे - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, चेन्नई (दु. 3.30 वाजता)

  • 18 मे - रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, बेंगळुरू (संध्या. 7.30 वाजता)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com