IPL 2024, DC vs LSG: लखनौला पराभूत केलं दिल्लीनं अन् विजयोत्सव साजरा केला राजस्थाननं

IPL 2024 Playoffs: दिल्ली कॅपिटल्सने लखनौ सुपर जायंट्सला पराभूत केल्यानंतर राजस्थान रॉयल्सचं आयपीएल 2024 मधील स्थान पक्के झाले आहे.
Delhi Capitals | Rajasthan Royals
Delhi Capitals | Rajasthan RoyalsSakal

IPL 2024, DC vs LSG: आयपीएल 2024 स्पर्धा आता अखेरच्या टप्प्यात आहे, त्यामुळे प्रत्येक सामन्यागणिक प्लेऑफची समीकरणं बदलताना दिसत आहेत. प्लेऑफच्यादृष्टीने असाच एक महत्त्वाचा सामना झाला दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्स संघात.

अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने 19 धावांनी विजय मिळवला आणि त्यांच्या विजयाचा उत्सव साजरा केला राजस्थान रॉयल्सने. कारण लखनौ पराभूत होताच राजस्थानचा प्लेऑफसाठीचा मार्ग मोकळा झाला. राजस्थान कोलकाता नाईट रायडर्सनंतर आयपीएलच्या 17 व्या हंगामात प्लेऑफमध्ये पोहचणारा दुसरा संघ ठरला.

याशिवाय या विजयासह दिल्लीनेही आपलं आव्हान कायम राखलं. इतकंच नाही तर दिल्लीचा हा शेवटचा साखळी सामनाही होता. त्यामुळे जरी दिल्लीला प्लेऑफमध्ये स्थान मिळवता आले नाही, तरी स्पर्धेचा शेवट विजयाने झाल्याचा त्यांना आनंद असेल.

याशिवाय कर्णधार ऋषभ पंतचे पुनरागमन, अभिषेक पोरेल, जॅक फ्रेझर मॅकगर्क, ट्रिस्टन स्टब्स या युवा खेळाडूंची कामगिरी यंदा दिल्लीसाठी सकारात्मक गोष्ट म्हणता येईल. लखनौचे मात्र या पराभवानंतर अडचणी वाढल्या आहेत. त्यांच्यासाठीही आव्हान कायम असलं तरी ते खूप कठीण आहे. तरी अद्याप त्यांचा एक सामना बाकी आहे.

Delhi Capitals | Rajasthan Royals
IPL 2024 DC vs LSG: दिल्लीने लखनौला मात देत राखला घरचा गड अन् स्पर्धेतील आव्हानही कायम; इशांतचा भेदक मारा ठरला निर्णायक

सामन्याबद्दल सांगायचं झालं तर टॉस जिंकून लखनौचा कर्णधार केएल राहुलनं पहिल्यांदा बॉलिंग करण्याला पसंती दिली. लखनौकडून अर्शद खाननं पहिल्याच ओव्हरमध्ये धोकादायक जॅक फ्रेझर मॅकगर्कला बाद करत लखनौला चांगली सुरुवात दिली होती. पण नंतर अभिषेक पोरेलने आक्रमण केलं आणि अर्धशतकही झळकावलं. त्याला शाय होपनं दमदार साथ दिली.

हे दोघं बाद झाल्यानंतर पंतनंही छोटेखानी खेळी केली. अखेरीस ट्रिस्टन स्टब्सने तुफानी खेळ केला. त्याने आक्रमक फटके खेळत दिल्लीला 200 धावांचा टप्पा पार करून दिला. त्यानेही आक्रमक अर्धशतक केलं. त्यामुळं दिल्लीने 20 ओव्हरमध्ये 4 बाद 208 धावा उभारल्या.

अरुण जेटली स्टेडियमचे मैदान फलंदाजीला पोषक आहे, अशात 208 धावाही पार होण्याची शक्यता होती. परंतु दिल्लीचा अनुभवी गोलंदाज इशांत शर्माने भेदक मारा केला. त्यानं लखनौच्या वरच्या फळीला मोठे धक्के दिले.

त्यानं त्याच्या पहिल्या तीन षटकातच केएल राहुल, क्विंटन डी कॉक अन् दीपक हुड्डा या प्रमुख फलंदाजांना माघारी धाडले. त्याचा हा स्पेल या स्पर्धेतील सर्वात मोठा फरक ठरला. त्याच्या या स्पेलचा फायदा दिल्लीला शेवटी झाला.

Delhi Capitals | Rajasthan Royals
IPL 2024: दिल्लीच्या विजयानं राजस्थानला मिळालं प्लेऑफचं तिकीट! आता उरलेल्या 2 जागांसाठी 5 संघात शर्यत, पाहा समीकरण

तरी सुरुवातीला विकेट्स जात असताना निकोलस पूरनने दुसऱ्या बाजूने दिल्लीच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवत 20 चेंडूत अर्धशतक केलं. पण त्याचा अडथळा मुकेश कुमारने दूर केला.

त्यानंतरही लखनौसाठी अर्शद खान उभा राहिला, त्यानेही खालच्या फळीला हाताशी धरत ५ षटकारांचा बरसात करत अर्धशतक केले आणि विजयासाठी प्रयत्न केले, पण त्याला दुसऱ्या बाजूने भक्कम साथ द्यायला कोणी नव्हतं आणि तोपर्यंत आवश्यत धावगतीही खूप वाढली होती. अखेरीस लखनौला विजयासाठी अवघ्या 19 धावा कमी पडल्या. लखनौ 20 ओव्हरमध्ये 9 बाद 189 धावाच केल्या.

आता या सामन्यानंतर दोन संघांपुढे प्लेऑफचा Q लागलाय, पण आता उरलेल्या 2 जागांवर कोण हक्क सांगणार हे पाहावे लागणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com