IPL 2024 : लखनऊविरुद्धच्या सामन्यापूर्वी गौतम गंभीरने घेतला माँ कालीचा आशिर्वाद!

IPL 2024 : गौतम गंभीर आणि केकेआर संघातील काही सदस्य कोलकातामध्ये असलेल्या कालीघाटी येथील प्रसिद्ध मंदीरात गेले आहेत आणि त्यांनी मां कालीचे दर्शन घेतले आहे.
IPL 2024-Gautam Gambhir
IPL 2024-Gautam Gambhir esakal

IPL 2024 : इंडियन प्रीमियर लीगच्या १७ व्या हंगामात रोमांचक सामने पाहायला मिळत आहे. आयपीएलच्या २२ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने कोलकत्ता नाईट रायडर्सला ७ विकेट्सने पराभूत केले आहे. कोलकाता आता आपला पुढचा सामना १४ एप्रिलला लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध इडन गार्डनवर खेळणार आहे, त्यापुर्वी संघाचा मार्गदर्शक गौतम गंभीर देवदर्शनाला गेला आहे.

गौतम गंभीर आणि केकेआर संघातील काही सदस्य कोलकातामध्ये असलेल्या कालीघाटी येथील प्रसिद्ध मंदीरात गेले आहेत आणि त्यांनी मां कालीचे दर्शन घेतले आहे. केकेआरच्या अधिकृत एक्स आकाऊंटवरुन जय मां काली अस म्हणत गौतम गंभीरचा काली देवीची पुजा करतानाचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत गौतम गंभीर देवीची आरती करताना दिसत आहे, तसेच तो देवीला चूनरी चढवताना दिसत आहे.

रिंकू आणि अनुकूलने घेतले होते देवीचे दर्शन-

गंभीरच्या अगोदर गुरुवारी केकेआरचे खेळाडू रिंकू सिंह, अनुकूल राॅय, व्यंकटेश अय्यर आणि वरुण चक्रवर्ती यांनी कालीघाटी येथे जावून काली देवीचे दर्शन घेतले होते. यावेळी सुद्धा कोलकाताच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन या खेळाडूंचा दर्शन करतानाचा व्हिडीओ शेअर करण्यात आला होता.

केकेआरच्या खेळाडूंपूर्वी मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या सुद्धा गुजरातच्या सोमनाथ मंदिरात दर्शनाला गेला होता आणि लखनौचे काही खेळाडू आयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाच्या दर्शनाला गेले होते.

IPL 2024-Gautam Gambhir
Rishabh Pant IPL 2024 : दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत होऊ शकतो एका सामन्यासाठी बॅन; काय आहे नेमकं प्रकरण?

केकेआरची चांगली सुरुवात-

आयपीएलच्या १७ व्या हंगामात श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली केकेआरची सुरुवात चांगली झाली आहे. कोलकाताने सुरुवातीचे सलग तीन सामने जिंकले होते परंतु सीएसकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या मागच्या सामन्यात संघाला अपयश आले आहे. गुणतालिकेत केकेआर आपल्या तीन विजयांसह दूसऱ्या क्रमांकावर आहे.

कोलकाताने गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली २०१२ आणि २०१४ साली आयपीएल ट्राॅफी जिंकली होती. केकेआर आपला पुढचा सामना रविवारी (१४ एप्रिल) लखनौविरुद्ध इडन गार्डनवर दूपारी ३.३० वाजता खेळणार आहे.

IPL 2024-Gautam Gambhir
Iran to attack Israel : इराण खरंच हल्ला करणार? भीतीपोटी इस्राइलपासून अमेरिकेपर्यंत दहशतीचे वातावरण, पुढे काय होणार?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com