Hardik Pandya : IPL सुरु होण्यापूर्वी पांड्याला पुन्हा झाली दुखापत? सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओमुळे खळबळ

हार्दिक पांड्यासाठी आयपीएलचा हा हंगाम खूप खास असणार आहे. दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर असलेल्या पांड्यासाठी टी-20 वर्ल्ड कपपूर्वी स्वत:ला सिद्ध करण्याची ही मोठी संधी आहे पण....
Hardik Pandya IPL 2024 Marathi News
Hardik Pandya IPL 2024 Marathi Newssakal

IPL 2024 Hardik Pandya : आयपीएल 2024 पूर्वी मुंबई इंडियन्सने मोठा निर्णय घेत रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवले. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने पाच वेळा आयपीएल जिंकले आणि 17 व्या हंगामापूर्वी त्याला कर्णधारपदावरून हटवून हार्दिक पांड्याकडे कमान सोपवण्यात आली. मुंबई इंडियन्स आता रोहितच्या पलीकडे पाहण्याचा विचार करत होते आणि म्हणूनच त्यांनी हार्दिककडे कर्णधारपद सोपवले.

त्यामुळे हार्दिक पांड्यासाठी आयपीएलचा हा हंगाम खूप खास असणार आहे. दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर असलेल्या पांड्यासाठी टी-20 वर्ल्ड कपपूर्वी स्वत:ला सिद्ध करण्याची ही मोठी संधी आहे. पण लीग सुरू होण्याच्या आठवडाभर आधी सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमुळे मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांची चिंता वाढली आहे.

Hardik Pandya IPL 2024 Marathi News
All England Open : लक्ष्य सेनने थाटात सेमीफायनलमध्ये मारली एट्री! 71 मिनिटांत माजी विजेत्याला चारली पराभवाची धूळ

ट्विटरवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे जो मुंबई इंडियन्सच्या सराव सत्रामधला दिसत आहे. व्हिडिओमध्ये हार्दिक मुंबई इंडियन्सच्या जर्सीत टेबलावर झोपला आहे. आणि फिजिओ त्याच्यावर उपचार करताना दिसत आहेत. संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक लसिथ मलिंगाही पांड्याच्या जवळ दिसत आहे. या व्हिडिओची सकाळ कोणतीही पुष्टी करत नाही.

उमेश राणा नावाच्या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. काही लोक हा व्हिडिओ खोटा असल्याचे सांगत आहेत. जर हार्दिक पांड्या खरोखरच दुखापतग्रस्त असेल तर संघासाठी मोठी समस्या असेल.

Hardik Pandya IPL 2024 Marathi News
BCCIने आखला मोठा डाव! IPL पुन्हा होणार भारताबाहेर, 'या' देशात रंगणार दुसऱ्या टप्पाचा थरार?

हार्दिक पांड्या आता संघाचा कर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू आहे. अशा स्थितीत तो बाहेर गेला तर संघाचे कर्णधारपद कोण सांभाळणार हा प्रश्न आहे. हार्दिक गेल्या दोन हंगामात गुजरात टायटन्सचे नेतृत्व करत होता. यासोबतच भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा अद्याप संघाच्या सराव शिबिरात दिसलेला नाही. गुरुवारी रणजी करंडक विजेतेपद पटकावणाऱ्या संघाच्या खेळाडूंसोबत एका पार्टीत तो दिसला. शुक्रवारी ॲड शूटमधील त्याचा फोटो व्हायरल झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com